दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्य़ांमध्ये होत असलेली वाढ याबाबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी चिंता व्यक्त केली आहे. बिहारमधील सर्व शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणसाठी ‘मार्शल आर्ट’चे प्रशिक्षण देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
बिहारमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधील मुलींना मार्शल आर्टचे प्रशिक्षण दिल्यास समाजकंटकांशी दोन हात करण्यास त्याचा त्यांना लाभ होईल, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे. येथे तीन दिवसांची आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद आयोजित करण्यात आली असून तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्यासह १७ देशांमधील प्रतिनिधींनी नितीशकुमार यांच्या निर्णयाचे कौतुक केले.
बिहारमधील एक लाखाहून अधिक मुलींनी यापूर्वीच मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले असून आता राज्यातील सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण दिले जाईल. महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा