जे डॉक्टर गरिबांच्या जीवाशी खेळतील त्यांचे त्यांचे हात छाटू असे विधान बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी केले होते. मात्र डॉक्टरांची उमटलेली तीव्र प्रतिक्रिया पाहता मांझी यांनी आपली भावना व्यक्त करण्यासाठी असे बोललो अशी सारवासारव केली. जे डॉक्टर्स प्रामाणिकपणे आपली सेवा देत नाहीत त्यांच्याबाबत हा ‘वाक् प्रचार’ आपण वापरला, असे मांझी यांनी सांगितले. मात्र ९० टक्के डॉक्टर्स प्रामाणिक असल्याचे प्रशस्तीपत्रही त्यांनी दिले. पूर्व चंपारण्य जिल्ह्य़ात शुक्रवारी मांझी यांनी रुग्णालयाच्या उदघाटनानंतरही हे विधान केले होते.

Story img Loader