बिहारमध्ये सध्या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा जोरात सुरू आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नितीशकुमार यांच्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो, असं बोललं जात आहे. याचदरम्यान नितीशकुमार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? असं पत्रकारांनी विचारलं असता नितीशकुमार म्हणाले, “मंत्रीमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विचारा.” याच विधानावरून बिहारच्या राजकारणात विविध तर्क-वितर्क लावले जात आहे. नितीशकुमार स्वत: मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव कसे घेऊ शकतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 uncle dharmarao baba atram vs nephew ambrishrao atram in aheri assembly constituency gadchiroli print politics news
अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Kalpana Soren electoral campaign
Kalpana Soren: झारखंड विधानसभा निवडणुकीत कल्पना सोरेन यांची हवा; महिलांसाठीच्या योजना गेमचेंजर ठरणार?
maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
sharad pawar eknath shinde ladki bahin yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा मतदारांवर किती परिणाम होईल? शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले…
On Friday Rahul Gandhi spoke with Prakash Ambedkar he said he will campaign against his candidate
राहुल गांधींचा प्रकाश आंबेडकरांना फोन; विधानसभा निवडणुकीबाबत राजकीय चर्चा…

हेही वाचा- “आम्ही BJP-RSS च्या विरोधात नाही, पण चुकीचा हिंदुत्ववाद…”, मुस्लीम नेत्याचं विधान!

याच विधानावरून उपेंद्र कुशवाह यांनी नितीशकुमारांवर हल्लाबोल केला आहे. मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नितीश कुमार यांच्या वक्तव्याबाबत उपेंद्र कुशवाह म्हणाले की, जेडीयू आणि आरजेडीमध्ये करार झाला आहे. दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची तयारी सुरू आहे, हे मी आधीच सांगितलं होतं. याच हेतुने जेडीयू आणि आरजेडी एकत्र आले आहेत. त्यामुळेच आता हळूहळू सर्व निर्णय नितीशकुमार यांच्याऐवजी तेजस्वी यादवच घेतील. तसं नसेल तर मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री असताना मंत्रीमंडळ विस्ताराचा निर्णय उपमुख्यमंत्री कसा काय घेऊ शकतात? असा सवाल उपेंद्र कुशवाह यांनी विचारला.

हेही वाचा- “…तर घुमट आणि निजामाच्या सर्व वास्तू नष्ट करू”, भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान

“नितीशकुमार म्हणाले की, मंत्रीमंडळ विस्ताराबाबत तेजस्वी यादव यांच्याशी बोला, पण असं कुठे असतं का? आताही जर कुणाला माझ्यावर विश्वास बसत नसेल तर तो दिवसही लवकरच येईल. जेव्हा दोन्ही पक्ष ठरल्याप्रमाणे एकत्र येतील,” असा दावाही कुशवाह यांनी केला.