बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिलं. अमृता फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे नवे राष्ट्रपिता असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर नितीश कुमारांनी नव्या भारताचे आता नवे पिता आले आहेत. या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? असा सवाल विचारला.

नितिश कुमार म्हणाले, “माझे वडील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. माझा जन्म स्वातंत्र्यानंतर झाला. मात्र, नंतर स्वातंत्र्यलढ्याची प्रत्येक गोष्ट समजून घेतली. भारताच्या स्वातंत्र्यातील महात्मा गांधींचं योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. मात्र, आता काही लोक राष्ट्रपिताविषयी काय बोलत आहेत हे सर्वजण पाहत आहेत.”

PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis on Allegations
Devendra Fadnavis : “मी व्हिडिओ बाहेर दिले नाहीत, ज्यात…”, ‘त्या’ दाव्यावर देवेंद्र फडणवीसांचं विधान
Narendra Modi
Narendra Modi : “आम्ही बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं”, पंतप्रधान मोदींचं छ. संभाजीनगरमध्ये वक्तव्य; काँग्रेसवर टीका करत म्हणाले…
nitish kumar bows down to touch feet of pm modi
VIDEO: भरसभेत नितीश कुमार पाया पडायला गेले अन् नरेंद्र मोदींनी…; नेमकं काय घडलं?

“जुन्या राष्ट्रपितांना विसरू जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत”

“आता हे म्हणत आहेत की जुन्या राष्ट्रपितांना विसरू जा, नवे राष्ट्रपिता आले आहेत,” असं म्हणत नितिश कुमार यांनी अमृता फडणवीसांच्या मोदींवर वक्तव्यावर टीका केली.

व्हिडीओ पाहा :

“नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं”

“नव्या भारताचे आता नवे पिता आले आहेत. या नव्या राष्ट्रपितांनी भारतासाठी काय केलं? त्यांनी काही काम केलंय का? त्यांच्या काळात भारत कोणत्या क्षेत्रात पुढे गेलाय?” असा प्रश्नही नितीश कुमारांनी विचारला.

“आज माध्यमांना तेच लिहावं लागत आहे जे सांगतील”

नितीश कुमार पुढे म्हणाले, “भाजपा आणि संघाने केवळ नव्या तंत्रज्ञानाचा जबरदस्तीने वापर केला आहे. आधी माध्यमं सरकार असो की विरोधी पक्ष, त्यांच्यावर आपली मतं अगदी स्पष्टपणे मांडायचे. मात्र, आज माध्यमांना तेच लिहावं लागत आहे जे सांगितलं जात आहे.”

हेही वाचा : “नितीश कुमारांचा सर्वनाश अटळ; मला पश्चाताप होतोय की मी…” प्रशांत किशोर यांचं विधान!

“भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात RSS चं काहीच योगदान नाही

“भारताच्या स्वातंत्र्याची लढ्यात झाली, मात्र त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) काहीही योगदान नव्हतं. आरएसएसला स्वातंत्र्य लढ्याशी काहीही देणंघेणं नव्हतं,” असा आरोपही नितीश कुमारांनी केला.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या, “आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत.”

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या होत्या, “मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही, मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते जल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही व घाबरतही नाही. मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते.”

“मी राजकीय वक्तव्य जास्त करीत नाही.   मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हा दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे.  मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काही बदल केले नाही,” असंही अमृता फडणवीसांनी नमूद केलं होतं.

जे चोवीस तास काम करतात त्यांनी मुख्यमंत्री व्हावे!

“जे २४ तास राजकारणासाठी देतात आणि राजकारणात जे लायक आहेत त्यांना मुख्यमंत्री केले पाहिजे.  देवेंद्रजी २४ तास समाजासाठी झटत असतात. मी राजकारणासाठी पूर्ण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे मला सध्या राजकारणात यायचे नाही,” असे अमृता फडणवीसांनी स्पष्ट केले होते.