Nitish Kumar Angry on Rjd MLA Rekha Devi : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar ) आज विधानसभेत चांगलेच भडकले. बिहार विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरु झालं तेव्हा विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरु केला. काही आमदार वेलमध्येही उतरले आणि गदारोळ करु लागले. मागच्या वर्षी दलित आणि मागासवर्गासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. अशात आज पुन्हा या मुद्द्यावरुन हंगामा सुरु झाला. या दरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आम्ही या संदर्भात केंद्राला पत्र लिहिलं आहे असं सांगितलं. मात्र विरोधी पक्षाचा हंगामा सुरु होता. त्यानंतर नितीश कुमार हे चांगलेच चिडले.

राजदच्या महिला आमदारावर नितीश कुमार ( Nitish Kumar ) भडकले

नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांचा संताप विधानसभेत चांगलाच चर्चेत राहिला. ते संतापले आणि राजदच्या महिला आमदारावर ते खेकसले. रेखा देवी या महिला आमदार आरक्षण ९ व्या सूचीत समाविष्ट करा अशी मागणी करत होत्या. रेखा देवींवर नितीश कुमार भडकले आणि म्हणाले महिला आहेस, तुला काहीही माहीत नाही, कुठून येतात हे लोक ? यांनी काय केलं आहे? असंही नितीश कुमार म्हणाले. २००५ नंतर आम्ही महिलांच्या सबलीकरणासाठी पावलं उचललं आहे. आता मी जे काही बोलतो आहे ते शांतपणे ऐका, आता मी बोलतो आहे. असं म्हणत नितीश कुमार चांगलेच संतापले.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “महाविकास आघाडी आणि काँग्रेस आमदार, खासदारांंमध्ये अस्वस्थता; अनेकजण…”; चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य
Nana Patole
Nana Patole : “उत्तमराव जानकरांसह आम्ही खूप लोक राजीनामा द्यायला तयार, पण…”; नाना पटोलेंचं मारकडवाडीत मोठं विधान
Sharad Pawar Speaking At Markadwadi.
Sharad Pawar : मी काय चुकीचं केलं? मारकडवाडीतील ग्रामस्थांसमोरच शरद पवारांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!

हे पण वाचा- Budget 2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना अर्थसंकल्पातून रिटर्न गिफ्ट, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने

नितीश कुमार नेमके का भडकले?

नितीश कुमार म्हणत होते की तुम्ही आता गदारोळ करु नका, विरोधकांनी जरा शांत रहावं. आरक्षणाच्या मुद्द्यावर हंगामा करण्यात काहीही अर्थ नाही. मात्र विधानसभेचं कामकाज सुरु होताच विरोधकांनी गदारोळ घातला. तसंच काही जण वेलमध्येही उतरले. विधानसभेचे अध्यक्ष नंदकिशोर यादव हे वारंवार विरोधकांना जागेवर जाऊन बसा असं सांगत होते. मात्र विरोधी पक्षाचे नेते गदारोळ घालत होते. या दरम्यान नितीश कुमार उभे राहिले. त्यांनी सांगितलं की जातनिहाय जनगणना झाल्यानंतर आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवली आहे. मात्र न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात आम्ही आता सर्वोच्च न्यायालयातही गेलो आहे. तसंच तुमचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नी आम्ही केंद्राला पत्र लिहिलं आहे. ९ व्या सूचीबाबत आम्ही केंद्राला विनंती केली आहे. आता या प्रकरणी गदारोळ घालून काहीही होणार नाही असं नितीश कुमार सांगत होते. मात्र विरोधकांनी गदारोळ घालत होते. त्यामुळे नितीश कुमार संतापले.

Story img Loader