Nitish Kumar : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिला आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जनता दल (युनायटेड) पक्षाने आज (२२ जानेवारी) मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. मणिपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार सत्तेत आहे. मात्र, नितीश कुमार यांनी एन.बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एन.बिरेन सिंह यांच्या सरकारचा पाठिंबा का काढून घेतला? यासंदर्भातील कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, जनता दल (युनायटेड) पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएला धक्का बसण्याची शक्यता आहे.

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचं पत्र जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष के.एस. बिरेन यांनी मणिपूरचे राज्यपाल एल.गणेशन यांना अधिकृत पत्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे. मणिपूरमध्ये जनता दल (युनायटेड) पक्षाचे सहा आमदार होते. त्यापैकी पाच आमदार याआधी भाजपामध्ये सामील झाले होते. त्यामुळे मणिपूरममध्ये जेडीयूचा एकच आमदार राहिला होता.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Controversy over MLA Suresh Khades statement about Miraj constituency as mini Pakistan
मिरजेच्या उल्लेखावरून वातावरण तापले
Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : “…अन्यथा दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल”, लाडकी बहीण योजनेबाबत छगन भुजबळांचं मोठं विधान
Nitish Kumar
Nitish Kumar : नितीश कुमार ‘ॲक्शन मोड’वर; बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करणार?
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis
Vijay Wadettiwar : ‘देवेंद्र फडणवीसांनी आता नरेंद्र मोदींचं वारसदार व्हावं’, विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूरमधील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. कॉनराड संगमा यांच्या पक्षाने भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं कारण मणिपूर राज्यातील हिंसाचाराचं सांगण्यात आलं होतं. नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर आता जनता दल यूनायटेडनेही मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला आहे. त्यामुळे भाजपासाठी हा धक्का मानला जात आहे.

मणिपूरमधील भाजपा सरकारवर कोसळणार का?

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काही धोका आहे का? सरकार कोसळणार का? असे अनेक सवाल विचारले जाऊ लागले आहेत. मात्र, जनता दल (युनायटेड) पक्षाने जरी पाठिंबा काढला असला तरी अद्याप मुख्यमंत्री एन.बिरेन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणताही धोका नाही. कारण भाजपाकडे पूर्ण बहुमत आहे.

जनता दल (यु)चा आमदार विरोधी बाकावर बसणार

जनता दल (युनायटेड) पक्षाने मणिपूरमधील भाजपाच्या सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. मणिपूरच्या राजकारणात ही मोठी घडामोड माणली जात आहे. कारण २०२२ पासून जेडीयूची भाजपासोबत युती होती. पण आता जेडीयूने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला. आता विधानसभेत जेडीयूचा एकमेव आमदार आता विरोधी बाकावर बसणार आहे.

Story img Loader