Bihar Congress MLA’s Son Dies By Suicide : बिहारमधील काँग्रेसचे नेते व विधीमंडळ पक्षनेते शकील अहमद खान यांच्या मुलाच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. बिहारमधील अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मला आत्ताच एक दुखद बातमी मिळाली आहे. बिहारमधील काँग्रेसचे विधीमंडळ पक्षाचे नेते व माझे मित्र डॉ. शकील अहमद खान यांच्या एकुलत्या एक मुलाचे अकाली निधन झाले आहे. माझ्या संवेदना शकीलभाई आणि त्यांच्या कुटुंबासमवेत आहेत. मुलगा गमावलेल्या पित्याचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी खूप दुःखी आहे.

आयान जाहिद खान असं मृत तरुणाचं नाव आहे. त्याने शासकीय बंगल्यातील त्याच्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे खान यांचं कुटुंब धक्क्यात आहे. आयानचं व १७ ते १८ वर्षांच्या आसपास होतं असं सांगितलं जात आहे.

pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Two children aged 2 and 17 died accidentally in separate incidents in Badlapur Kalyan East
कल्याण, बदलापूरमध्ये दोन बालकांचा अपघाती मृत्यू
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
14 year old school boy committed suicide by shooting himself in head with his fathers revolver at Adhegaon in Madha taluka
शाळकरी मुलाची गोळी झाडून आत्महत्या
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या

आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

शकील अहमद खान यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. त्यांचा मुलगा आयान रात्री त्याच्या खोलीत झोपला हाता. सकाळी तो त्याच्या खोलीबाहेर आलाच नाही. त्यामुळे घरातील सदस्य त्याच्या खोलीत गेले असता त्याचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबातील सदस्यांना मोठा धक्का बसला. शकील अहमद खान यांचं शासकीय निवासस्थान सचिवालय पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं. या घटनेची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तपासासाठी एफएसएलचं पथकही बोलावण्यात आलं. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करू लागले आहेत.

शकील खान हे संघर्षाच्या काळात काँग्रेसची बाजू भक्कमपणे सांभाळत आहेत

शकील अहमद खान हे मूळचे कटिहार जिल्ह्यातील कबर कोठी गावचे रहिवासी आहेत. त्यांनी पाटणा विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तर दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी एमए, एम फिल व पीएचडी पूर्ण केली आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९९९ साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१५ ला ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. कटीहारमधील कदवा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २०२० च्या निवडणुकीत ते पुन्हा एकदा विजयी झाले. यंदा ते तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढणार आहेत. काँग्रेसचे राज्यात सध्या केवळी १९ आमदार आहेत. एकेकाळी सत्ताधारी असणारी काँग्रेस सध्या बिहारमध्ये संघर्ष करतेय. मात्र या संघर्षाच्या काळात शकील खान सलग दोन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकत विधानसभेत पोहोचले आहेत.

Story img Loader