Bihar Constable Removed over dancing on tej Pratap Yadav instruction Viral Video : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेज प्रताप यादव यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये होळीनिमित्त आयोजित केलेल्या गाण्यांच्या कार्यक्रमात बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव हे एका पोलीस शिपायाला धमकी देऊन नाचायला भाग पाडताना दिसत आहेत. दरम्यान आमदार तेज प्रताप यांच्या सांगण्यावरून सार्वजनिक ठिकाणी नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार पोलिसांनी त्या शिपायावर कारवाई केली आहे. आमदार तेज प्रताप यादव यांच्या अंगरक्षक पदावरून शिपाई दीपक कुमार यांना काढून टाकण्यात आले आहे.

रविवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात पाटणाच्या एसपी कार्यालयाकडून याबद्दल माहिती देण्यात आली आहे. “सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये बिहार विधानसभेचे आमदार तेज प्रताप यादव हे अंगरक्षक (शिपाई) दीपक कुमार यांना नाचण्याची सूचना देत आहेत. सार्वजनिक ठिकाणी गणवेशात नाचत असल्याची माहिती मिळताच, शिपाई दीपक कुमार यांची पोलीस सेंटर येथे बदली करण्याचे आणि दुसर्‍या शिपायास अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.”

नेमकं काय झालं होतं?

दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडीओत आमदार तेज प्रताप यादव म्हणाले की, “ये शिपाई, मी आता एक गाणे वाजवणार आहे. त्यावर तुला नाचावे (ठुमके) लागेल. नाही नाचलास तर तुला निलंबित करू” यानंतर तेज प्रताप यादव गाणं गातात आणि पोलीस शिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यावर नाचतो. इतकेच नाही तर तेज प्रताप यादव “बुरा मत मानो, होली है” असेही म्हणताना ऐकू येत आहे.

तेज प्रताप यादव यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात टीका झाली होती. जनता दल युनायटेड पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन प्रसाद यांनी म्हटले की, अशा कृत्यांना बिहारमध्ये थारा देता कामा नये. बिहारमधील जंगलराज संपुष्टात आलेले आहे. पण लालू यादव यांचे युवराज पोलिसाला नाचण्यासाठी धमकी देत आहेत. तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव किंवा लालू यादव यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असू द्या, त्यांनी आता बिहार बदलला आहे. हे समजून घ्यावे.

भाजपाचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनीही तेज प्रताप यादव यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, जसा बाप तसा पुत्र. लालू यादव यांनी मुख्यमंत्री असताना आपल्या इशाऱ्यावर व्यवस्थेला नाचविले आणि बिहारला जंगलराजमध्ये बदलले. त्याचप्रमाणे आता त्यांचा मुलगा सत्तेच्या बाहेर असतानाही कायद्याच्या रक्षकांना खुलेआम धमकी देत आहे.

Story img Loader