बिहार विधानसभेत आज नितीश कुमार सरकारची बहुमत चाचणी सुरू आहे. जेडीयू (JDU) आणि आरजेडी (RJD) यांच्या सरकारला १६४ आमदारांचे समर्थन असल्याने ही बहुमत चाचणी ते आरामात जिंकतील अशी परिस्थिती आहे. दरम्यान, आज विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत बोलताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपाचे तीन जावाई आहेत. ईडी, सीबीआय आणि आयटी, जे लोकं भाजपाला शरण येत नाहीत. त्यांच्यावर या जावायांकडून दबाव आणला जातो, असे ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – झारखंड : मुख्यमंत्री सोरेन यांच्या निकटवर्तीयाच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी, ए.के.४७ रायफल्स आणि जिवंत काडतुसे जप्त

काय म्हणाले तेजस्वी यादव?

”विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत भाग घेताना बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भाजपावर जोरदार टीका केली. देशात भाजपाचे तीन जावाई आहेत. ईडी, सीबीआय आणि आयटी. जे लोकं भाजपाला शरण येत नाहीत. त्यांच्यावर या जावायांकडून दबाव आणला जातो. त्यांच्यावर खोटी कारवाई केली जाते, असे म्हणाले. तसचे नितीश कुमार यांच्याशी झालेली आघाडी ही इतक्यात संपणारी नाही, ती वर्षानुवर्ष टीकून राहणार आहे, आमची जोडी बिहारमध्ये चमत्कार करून दाखवेन, असेही ते म्हणाले.

बहुमत चाचणीआधी आमदारांवर कारवाई

दरम्यान, बिहारमध्ये बहुमत चाचणीआधी सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांवर कारवाई केली असल्याने राजकीय वातावरण तापलं होते. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित नोकरी घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने नेत्यांच्या घरावर छापेमारी केली होती. अशफाक करीम आणि सुनील सिंग यांच्या घरांसह अनेक ठिकाणी सीबीआयने छापे टाकले होते.