सकाळी वृत्तवाहिन्यांचा ‘कल’कलाट सुरू झाला. तो स्वाभाविकच होता. त्यांना कलाकलानेच दिवस भरवायचा होता. पहिल्या तासाभरात पोस्टाने आलेल्या मतपत्रिकांची मोजणी झाली. त्यात भाजप जदयुच्या पुढे गेला. तोही तब्बल दहा जागांनी म्हटल्यावर हाच ट्रेंड कायम राहणार असे चॅनेलांवरील सारेच ‘चर्चिल’ म्हणू लागले. नऊ वाजता भाजप पंधरा जागांवर पुढे गेला आणि भाजपाईंची दिवाळी सुरू झाली. जिलेबीची भट्टी लागली. कार्यकर्ते खुशीने जिलेब्यांवर ताव मारू लागले. तेवढय़ात हळूच कुणीतरी सांगितले, कमळाची एक-एक पाकळी गळू लागली आहे. कल फिरला आहे. तसे जिलेबीवर ताव मारणारे पांगू लागले. पहिला टप्पा संपला नि जिलेबीची भट्टी विझली. पाक वाया गेला. ‘११, अशोक रस्ता’ ओकाबोका दिसू लागला. आता तेथे कार्यकर्त्यांपेक्षा पोलीसच जास्त दिसत होते. भाजपचा तो ‘जिलेबीवाला’ निघून गेला होता.. अच्छे दिन येतील, असं आश्वासन पुन्हा एकदा देऊन!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सकाळपासून भाजप मुख्यालयात गर्दी जमत होती. मोठमोठाली वाहने रांगेत लागली. पहिले आले ते शाहनवाजभाई. केसांचा कोंबडा ठीक करून त्यांनी बूमधारकांना बाइट देऊन टाकला – मुख्यमंत्री भाजपचाच! भाजपचे चॅनेलस्नेही प्रवक्ते संबीत पात्रा यांनी तर मोदींचा विजयरथ दिल्लीतून थेट पाटण्यात नेऊन ठेवला. एकीकडे जिंदाबाद-जिंदाबादचा गजर सुरू होता. फटाके फोडले जात होते. तेवढय़ात भाजपचे संघनिष्ठ नेते राम माधव यांची प्रतिक्रिया आली. ते म्हणत होते, ‘काही विचारवंत, वैज्ञानिक, लेखकांनी केलेल्या मोदीविरोधी वातावरणाचा परिणाम बिहारमध्ये झाला व तेथील जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला..’ पुष्पगुच्छांची देवाण-घेवाण सुरू झाली. दिवाळीची मंगलमय सुरुवात झाली होती. वृत्तवाहिन्यांवर (एक अपवादवगळता) सर्वानी भाजपचे सरकार स्थापन करून टाकले होते. मोदीलाटेला त्सुनामी गणले गेले. साधारण दहा-साडेदहा वाजले नि मग एकदम फटाक्यांची आतषबाजी थांबली. मिठाईवाटप बंद झाले. पुष्पगुच्छ गाडय़ांमध्येच ठेवून नेते/कार्यकर्ते सांत्वनासाठी मुख्यालयात येऊ लागले. लाट विरली होती. कल बदलला, तसतशी भाजप नेत्यांची वक्तव्ये बदलली. राम माधव यांनी नितीशकुमार, लालूप्रसाद यादव यांना शुभेच्छा देऊन चुकीचे परिमार्जन करून घेतले. गर्दी ओसरू लागली. ‘११, अशोक रस्त्या’ऐवजी अमित शहा यांच्या निवासस्थानी वर्दळ वाढली. रविशंकर प्रसाद, धर्मेद्र प्रधान, अनंतकुमार, भूपेंदर यादव तेथे पोहोचले. शहा यांनी सर्वाची खरडपट्टी काढली. दोन दिवसांपूर्वी, ‘मी ८ तारखेला बोलेन’ असे म्हणणारे शहा दिवसभर कॅमेऱ्यासमोर आलेच नाहीत..

‘२४, अकबर रस्त्या’च्या आयुष्यात दीड वर्षांंनी ‘अच्छे दिन’ आले. सकाळी दहा वाजेपर्यंत महिला काँग्रस अध्यक्षा शोभा ओझा प्रतिक्रिया देत होत्या. कशाबशा. तोवर वृत्तवाहिन्यांवरून कल बदलत असल्याचे आकडे आले. तेवढय़ात आले ते टॉम वडक्कन! भाजपचा दणक्यात पराभव होतोय म्हटल्यावर कार्यकर्तेही जमा झाले.
फटाक्यांची आतषबाजी झाली. दीड वर्षांनी फटाके, फुलं, मिठाई काँग्रेस मुख्यालयात वाटली जात होती. ‘राग बिहारी’त काँग्रेसचा सूर मिसळला याचं कौतुक काँग्रेस नेते वृत्तवाहिन्यांना सांगू लागले. राहुल गांधी यांनी मुख्यालय चरणधूळ झाडली. एरव्ही ओकेबोके वाटणाऱ्या ‘जंतर-मंतर’वरच्या जदयू मुख्यालयातदेखील जाग आणि जान आली होती. विजयाच्या फटाक्यांनी मुख्यालयाचा परिसर दणाणून गेला होता. जय-पराजयाच्या लोकशाही उत्सवात पक्ष कार्यालये सहभागी झाली होती..

बिहार विधानसभेचे निवडणूक निकाल जाहीर होताच सुरुवातीला राष्ट्रीय लोकशाही आघाडी पुढे असल्याचे वृत्तवाहिन्यांवरून सांगण्यात येत होते, त्यामुळे रविवारी पक्ष कार्यालयात उत्साह होता. मात्र नंतरच्या टप्प्यात भाजप मागे पडला आणि पक्ष कार्यालयात सन्नाटा पसरला, प्रतिक्रिया देणारे गायब झाले.
दखलपात्र

तेजस्वी प्रसाद यादव (विजयी)
राष्ट्रीय जनता दल, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा.
मतदारसंघ – राघोपूर ’मते – ९१२३६
प्रतिस्पर्धी – सतीश कुमार (भाजप)

जितनराम मांझी (विजयी)
हिंदुस्तानी आवाम मोर्चा, २०१४-१५ या काळात बिहारचे मुख्यमंत्री. १९८० पासून बिहार विधानसभेचे सदस्य.
मतदारसंघ – इमामगंज ’मते – ७९३८९
प्रतिस्पर्धी – उदय नारायण
चौधरी (संयुक्त जनता दल)

तेजप्रताप यादव (विजयी) राजद
लोकसभा सदस्य, राजदचे अध्यक्ष आणि लालूप्रसाद यादव यांचा ज्येष्ठ पुत्र.
मतदार संघ – महुआ ’मते – ६६,९२७
प्रतिस्पर्धी – रवींद्र राय
(हिंदुस्तान आवाम मोर्चा)

संतोषकुमार सुमन (पराभूत)
हिंदुस्तानी आवाम मोर्चा, माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांचा मुलगा.
मतदारसंघ – कुटुंबा ’मते – ४१२०५
प्रतिस्पर्धी – राजेश कुमार (कॉंग्रेस)

अब्दुल बरी सिद्दिकी (विजयी)
राजद, बिहार विधानसभेचे
माजी विरोधी पक्षनेते.
मतदारसंघ – अलीनगर ’मते-६७४६१
प्रतिस्पर्धी – मिश्रीलाल यादव (भाजप)

अख्तर उल इमान (पराभूत)
एमआयएम, राष्ट्रीय
जनता दलाचे माजी आमदार.
मतदारसंघ- कोछाधमन ’मते- ३७०८६
प्रतिस्पर्धी – मुजाहिद आलम

पशुपती कुमार पारस (पराभूत)
लोजप, केंद्रीय मंत्री
रामविलास पासवान यांचे ज्येष्ठ बंधू.
मतदारसंघ – अलौली ’मते – ४६०४९
प्रतिस्पर्धी – चंदनकुमार (राजद)

अब्दुल रहमान (पराभूत)
भाजपचे मुस्लिम उमेदवार.
मतदारसंघ – कोछाधमन ’मते- ३४८९५
प्रतिस्पर्धी – मुजाहिद
आलम (संयुक्त जनता दल)

प्रदीप जोशी (पराभूत)
कट्टर हिंदुत्ववादी, राष्ट्रीय सेवा दल पक्षाचे संस्थापक.
मतदार संघ – देहरी ’मते – २९५४१
प्रतिस्पर्धी – मोहम्मद हुसेन
(राष्ट्रीय जनता दल)

अनंतकुमार सिंग (विजयी)
पक्ष – अपक्ष, मोकमा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा विजयी.
मतदारसंघ – मोकमा ’ मते – ५४००५
प्रतिस्पर्धी – नीरजकुमार (सं. जनता दल)

नंदकिशोर यादव (विजयी)
भाजप, विरोधी पक्षनेते, माजी मंत्री
मतदारसंघ – पाटणा साहिब
’मते – ८८१०८
प्रतिस्पर्धी – संतोष मेहता (राजद)

राजेंद्र प्रसाद सिंग (पराभूत)
भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, भाजपमध्ये जबाबदारी
मतदार संघ – दिनारा ’मते – ६२००८
प्रतिस्पर्धी – जयकुमार
सिंग (संयुक्त जनता दल)