बिहारमध्ये थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. गोपालगंज येथे एका मंदिरातील धर्मगुरूचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. आरोपींनी धर्मगुरूचे दोन्ही डोळे काढल्याचं सांगण्यात येत आहे. मनोज कुमार ( २२ ) असं खून झालेल्या धर्मगुरूचं नाव आहे. धर्मगुरूचा मृतदेह आढळल्यानंतर नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग २७ रोखून धरला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मनोज कुमार बेपत्ता होते. अखेर शनिवारी ( १६ डिसेंबर ) मनोज कुमार यांचा मृतदेह

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांना आढळून आला. त्यावेळी पोलिसांना मनोज कुमार यांच्या शरीरावर गोळीचे निशाण आढळून आले. मनोज कुमार यांचे दोन्ही डोळे काढले असून गुप्तांगही कापण्यात आलं आहे. तसेच, मनोज कुमार यांची जीभही आरोपींनी कापली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्ग २७ रोखून धरला असून एकच गोंधळ घातला आहे. धर्मगुरूंचा मृतदेह ताब्यात देण्यास ग्रामस्थांनी पोलिसांना नकार दिला आहे. यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला आहे.

याप्रकरणावरून भाजपाचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारवर टीका केली आहे. “बिहारच्या गोपालगंजमध्ये एका तरूण धर्मगुरूचा गोळ्या झाडून खून करण्यात आला आहे. यानंतर पाच दिवसांनी धर्मगुरूचा मृतदेह आढळला. बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ आले आहे,” असं टीकास्र शेहजाद पूनावाला यांनी नितीश कुमार सरकारवर सोडलं आहे.