दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेत बोलताना नितीश कुमार यांनी मदत दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं आहे. “दारु प्राशन केल्याने मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई दिली जाणार नाही. आम्ही नेहमीच मद्यप्राशन करु नका, मृत्यू होईल असं आवाहन करत आहोत. मद्यप्राशनाच्या बाजूने बोलणारे तुमचं काही भलं करु शकत नाहीत,” असं नितीश कुमार म्हणाले आहेत.

बिहारमध्ये विषारी दारूच्या बळींची संख्या ४० वर; राज्य सरकारवर कारवाई करण्याची विरोधकांची मागणी

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
uttar pradesh jhanshi hospital fire
Jhansi Fire: झाशीमध्ये हाहाकार! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू, योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
Pansare murder case, ATS claim, high court,
पानसरे हत्या प्रकरणाचा सर्व पैलूंनी तपास, एटीएसचा उच्च न्यायालयात दावा
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना

बिहारमध्ये विषारी दारू प्राशन केल्याने बिहारमध्ये ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ‘जे लोक बनावट दारू पितात, त्यांचा मृत्यू होणारच’ (जो पियेगा, वो मरेगा!) असं विधान केल्याने विरोधकांनी त्यांना लक्ष्य केलं. नितीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. नितीश कुमार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून ही माझी वैयक्तिक इच्छा नसून राज्यातील महिलांच्या आक्रोशाला प्रतिसाद आहे, असं सांगितलं.

संसदेतही हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपा खासदारांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र भाजपासह अन्य पक्षांनी नितीश कुमार यांच्या दारू धोरणावर जोरदार टीका केली. विरोधी पक्षांनी सलग दुसऱ्या दिवशी विधानसभेत गोंधळ घातला. तर बिहारमधील महाआघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या सीपीआय (एमएल) लिबरेशनने पुनरावलोकनाची मागणी करत कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर निदर्शने केली.