देशाच्या आरोग्य व्यवस्थेमधील त्रुटींबाबत मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसून येते. यामध्ये डॉक्टर्स उपलब्ध नसण्यापासून उपचारांसाठी आवश्यक सामग्रीच अनेक ठिकाणी उपलब्ध नसल्याची बाब वारंवार समोर येताना पाहायला मिळते. या कारणामुळे काही ठिकाणी संबंधित रुग्णाचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्याचं दिसत आहे. अशीच एक घटना बिहारमधून समोर आली असून युरिनल बॅग नव्हती म्हणून रुग्णालय कर्मचाऱ्यानं रुग्णाला चक्क स्प्राईटची बाटली लावल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

हा सगळा प्रकार सोमवारी रात्री घडला. बिहारच्या सदर रुग्णालयात एका रुग्णाला बेशुद्ध अवस्थेमध्ये दाखल करण्यात आलं. या रुग्णाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला युरिनल बॅग लावण्याच्या सूचना दिल्या. तसेच, इन्सुलिन इंजेक्शन देण्याच्याही सूचना दिल्या.

दरम्यान, डॉक्टरांनी या सूचना दिल्यानंतर रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आवश्यक ती सामग्री रुग्णाला देणं अपेक्षित होतं. मात्र, त्या सामग्रीचा व औषधांचा तुटवडा असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी युरिनल बॅगेऐवजी स्प्राईटची बाटली लावली. यामुळे रुग्णाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यताही होती. हा प्रकार पाहाता रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयाचे व्यवस्थापक रमेश पांडे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

अशा स्थितीत रात्रभर रुग्णाला राहावं लागल्यानंतर मंगळवारी सकाळी आवश्यक ती सामग्री पुरवण्यात आली. यासंदर्भात रुग्णालय व्यवस्थापक रमेश पांडे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वस्तू उपलब्ध नसल्याची आपल्याला कल्पनाच नव्हती. मात्र, माहिती मिळाल्यानंतर या वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असं पांडे यांनी सांगितलं.