Pappu Yadav Press Conference: पूर्णियाचे अपक्ष उमेदवार पप्पू यादव यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी वादग्रस्त विधान केले आहे. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आव्हान केले की, “मंगळवार ४ जून रोजी मतमोजणीच्या वेळी डोक्याला कफन बांधून तयार रहावे, गरज पडल्यास मरण्याची तयारी ठेवावी. पूर्णियामधील जागेसाठी लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्यास महाभारतासारखे युद्घ होईल.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतमोजणी प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने पार पाडावी

मतमोजणीपूर्वी पत्रकार परिषद देताना पप्पू यादव यांनी स्पष्टपणे सांगितले की,”पूर्णियाचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने पार पाडावी. आमचे पूर्ण सहकार्य असेल, पण लोकशाही वाचवण्यासाठी आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याने डोक्याला कफन बांधून तयार रहावे कोणतीही गडबड होऊ देणार नाही”, यावेळी पप्पू यादव यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसले.

पूर्णिया आणि बिहारमधील प्रत्येक कार्यकर्त्याने लोकशाही वाचवण्यासाठी उद्या मरायला तयार राहावे, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – तासाभरात सुरु होणार मतमोजणी, निकालांकडे देशाचं लक्ष

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

पप्पू यादव एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी “टपाल मतपत्रिका आधी का मोजल्या जात नाहीत?असे विचारत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग ते सर्वात शेवटी का करते आहे? पोस्टल मतपत्रिकांची शेवटची मोजणी करणे हा भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणाचा मार्ग आहे. भारत आघाडीच्या सर्व उमेदवारांनी पोस्टल मतपत्रिकेची मोजणी करून त्यांच्यासमोर स्वाक्षरी करून घ्यावी” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा –अटीतटीची लढत, प्रतिष्ठा पणाला; सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या मतदारसंघांमध्ये कोण मारणार …

पूर्णियामध्ये माजी खासदार पप्पू यादव हे राष्ट्रीय जनता दलच्या विमा भारती आणि जनता दलचे संतोष कुशवाह यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. पप्पू यादव हे येथून अपक्ष उमेदवार आहेत. काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्याने राजदने काँग्रेसला ही जागा न दिल्याने ते अपक्ष म्हणून उभे राहिले. आता या निवडणुकीत विजय मिळवणे पप्पू यादव यांच्यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्यांची प्रतिष्ठेचा पणाला लागली आहे. त्यांनी अनेकवेळा आपल्या विजयाचा ठाम दावा केला आहे. मात्र, आता विजयाचा मुकुट पप्पू यादवच्या डोक्यावर बसतो की नाही हे काही वेळातच समोर येईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar independent candidatepappu yadav press conference controversial statement regarding vote counting in purnea seat lok sabha election result 2024 snk