पीटीआय, पाटणा
बिहारचे मंत्री संतोष सुमन यांनी मंगळवारी अचानक मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे ते पुत्र आहेत. त्यांच्याकडे अनुसूचित जाती आणि जमाती कल्याण विभागाचे मंत्रिपद होते.जीतन राम मांझी यांनी स्थापन केलेल्या हिंदूस्तान अवाम मोर्चा (एचएएम) या पक्षाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. एचएएमचे संयुक्त जनता दलामध्ये विलिनीकरण करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत त्यांनी पदाचा राजीनामा दिला.
आपल्या वडिलांची मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निष्ठा असल्यामुळे ते गेल्या वर्षी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडले आणि महागठबंधनमध्ये सहभागी झाले. आम्हाला महागंठबधनमध्ये ठेवायचे की नाही याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे असेही सुमन म्हणाले. तर सुमन यांचा राजीनामा म्हणजे नितीश कुमार यांच्या विरोधी पक्षांच्या ऐक्याच्या प्रयत्नाला धक्का असल्याची टीका भाजपने केली आहे.