बिहारचे पर्यावरण आणि वनमंत्री तेज प्रताप यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशद्रोही म्हटलं आहे. तसेच भारतात राहून भारताला शिव्या देणं योग्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. पाटणा येथील प्राणीसंग्रहालयात सुरू असलेल्या तीन दिवसीय राष्ट्रीय जीवशास्त्रज्ञ परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाप्रणित एनडीएविरोधात इंडिया (I.N.D.I.A.) या आघाडीची निर्मिती केली आहे. विरोधी पक्षांच्या या आघाडीवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी या पक्षांमधील नेत्यांना अहंकारी म्हणाले होते. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी तेज प्रताप यादव यांना प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशद्रोही आहेत. भारतात राहून भारताला शिव्या देणं योग्य नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, तेज प्रताप यांच्या टीकेनंतर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव ऋतुराज सिन्हा यांनी पलटवार केला आहे. सिन्हा म्हणाले, युतीचं नाव I.N.D.I.A. ठेवून कोणी भारताचा प्रतिनिधी होत नाही. भारत कोणत्याही एका व्यक्तीचा किंवा पक्षाचा नाही. भारतातली १४० कोटी जनता म्हणजे भारत आहे.

पाटणा येथील प्राणीसंग्रहालयात शनिवारपासून (५ ऑगस्ट) तीन दिवसीय राष्ट्रीय जीवशास्त्रज्ञ परिषदेच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी तेज प्रताप यादव उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. प्रसारसमाध्यमांशी बोलताना तेज प्रताप यादव म्हणाले, भाजपा पराभूत झाली आहे. आगामी निवडणुकीत त्यांचा सुपडा साफ होईल. भाजपा, आरएसएस आमच्या महाआघाडीसमोर म्हणजेच इंडियासमोर टिकू शकणार नाहीत. मी याआधीही सांगितलं आहे, २०२४ (लोकसभा निवडणुकीत) आणि २०२५ (आगामी बिहार विधानसभा निवडणूक) मध्ये भाजपाचा सुपडा साफ होईल.