Bihar 5-year-old Shoots Another Student : बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंजमध्ये बुधवारी (३१ जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. लालपट्टी येथील एका खासगी शाळेतील नर्सरीमधील पाच वर्षांच्या विद्यार्थ्याने तिसरी इयत्तेत शिकणाऱ्या १० वर्षीय विद्यार्थ्यावर गोळी झाली आहे. गोळी त्या विद्यार्थ्याच्या डाव्या पायात घुसली आहे. हा चिमुरडा शाळेच्या दप्तरातून बंदूक घेऊन आला होता. दरम्यान, बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी त्याच्या पायात घुसलेली गोळी बाहेर काढली असून त्याची प्रकृती आता स्थिर होत आहे. तो सध्या अतिदक्षता विभागात आहे.

या घटनेने शाळा हादरली आहे. हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर शाळेने याबाबत पोलिसांना माहिती दिली आहे. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरू केला. या विद्यार्थ्याकडे बंदूक कुठून आली याचा पोलीस शोध घेत आहेत. शाळा भरल्यानंतर प्रार्थनेच्या काही वेळ आधी ही घटना घडली आहे. या आरोपी विद्यार्थ्याचे वडील पूर्वी याच शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचे, असं स्थानिकांनी सांगितलं आहे.

Case registered against school cashier for embezzling Rs 16 lakh Pune news
शाळेतील रोखपाल महिलेकडून १६ लाखांचा अपहार; लोणी काळभोर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Nagpur Crime News
Nagpur Crime : विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक, मोबाइलमध्ये आढळले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
Crime News
Crime News : “मृत्यूनंतर काय होतं?”, गुगलवर सर्च केलं आणि स्वत:वरच झाडली गोळी; ९वीत शिकणाऱ्या मुलाचे धक्कादायक कृत्य
School Girl Uniform
संतापजनक! मुख्याध्यापकाने ८० मुलींना शर्ट काढायला लावले; दहावीच्या विद्यार्थीनींनी ‘पेन डे’ साजरा केल्याची शिक्षा
Mumbai Girl Suicide
Mumbai Crime : मुंबईतल्या शाळेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या, बुटाच्या लेसने गळफास घेत आयुष्य संपवलं

आरोपीचे वडील मुलाला घेऊन फरार

जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी सागितलं की आम्हाला शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन आला होता, ते आम्हाला म्हणाले, तुमच्या मुलाला गोळी लागली असून आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केलं आहे, तुम्ही तातडीने रुग्णालयात या. दरम्यान, मुख्याध्यापकांनी आरोपी विद्यार्थ्याच्या वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर या विद्यार्थ्याचे वडील शाळेत दाखल झाले. त्यांनी मुख्याध्यापकांच्या टेबलावर ठेवलेली बंदूक पाहिली, सर्व घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी टेबलावर ठेवलेली बंदूक उचलली, मुलाला कडेवर घेतलं आणि तिथून पळ काढला. शाळेच्या सुरक्षा भितीवरून उडी मारून ते तिथून फरार झाले. पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत. आरोपी मुलाचे वडील एका दुचाकीवरून शाळेत आले होते. ती दुचाकी शाळेच्या आवारात सोडून ते तिथून पळून गेले आहेत.

हे ही वाचा >> नोकरी मागणाऱ्या Gen Z उमेदवारानं उद्योजिकेलाच केली शिवीगाळ; महिलेनं शेअर केला धक्कादायक अनुभव!

जखमी मुलाचं कुटुंब धक्क्यात

जखमी विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी शाळा व पोलीस प्रशासनाकडे या घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये. या घटनेनंतर जखमी विद्यार्थ्याचे पालक मोठ्या धक्क्यात आहेत. एक लहानगा मुलगा असं काहीतरी करू शकेल यावर त्यांचा विश्वास बसत नाहीये. जखमी विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे मागणी केली आहे की त्यांनी आरोपी मुलाच्या पालकांना ताब्यात घेतलं पाहिजे. तसेच त्यांच्या नातेवाईकाकडे चौकशी केली पाहिजे.

Story img Loader