आर्थिक विकासाच्या निकषावर ३१ मार्च २०१२ रोजी संपलेल्या अकराव्या पंचवार्षिक योजनेत सर्वच राज्यांत बिहार हाच सर्वोत्तम ठरला आहे. सकल राज्यीय उत्पादनाच्या निकषावर मात्र सिक्कीम आणि गोवा या राज्यांनी बिहारला मागे टाकले असले तरी त्यांचे आकारमान लहान असल्याने त्यांच्या आर्थिक विकासातील झेप बिहारसमोर झाकोळली जाते, असेही नियोजन आयोगाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.
२००७ ते २०१२ या पाच वर्षांत बिहारचे सकल राज्यीय उत्पादनाचा वृद्धीदर २१.९ टक्के होता. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेश यापैकी कोणतेही मोठे राज्य २० टक्क्य़ांपेक्षा पुढे मजल मारू शकले नाही. सकल राज्यीय उत्पादनात सर्वोच्च स्थान मात्र सिक्कीमने पटकावले असून त्यांचा वृद्धीदर ३१.६ टक्के आहे तर त्याखालोखाल गोव्याचा वृद्धीदर २२.९ टक्के आहे. गुजरातचा आर्थिक वाढीचा दर १६ टक्के असून महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचा हा दर प्रत्येकी १५.३ टक्के आहे.
झारखंड (९.२ टक्के) आणि पुद्दुचेरी, नागालँड, मणिपूर या राज्यांची कामगिरी सर्वात निराशाजनक आहे.    
आर्थिक वृद्धीदर
सिक्कीम   ३१. ६ टक्के
गोवा       २२.९ टक्के
बिहार     २१.९ टक्के
गुजरात   १६ टक्के
महाराष्ट्र   १५.३ टक्के

Story img Loader