गेल्या काही महिन्यांमध्ये रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असल्याचं समोर आलं आहे. आता बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यात रेल्वेची मोठी दुर्घटना टळली आहे. दिल्लीला जाणारी बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेस अचानक दोन भागात विभागली गेली. रेल्वेचे डबे इंजिनपासून वेगळे झाल्याची माहिती समोर येत आहे.

बिहार क्रांती एक्स्प्रेस ही गाडी दरभंगा ते नवी दिल्ली असा प्रवास करत होती. मात्र, समस्तीपूर-मुझफ्फरपूर रेल्वे विभागातील खुदविराम बोस पुसा रेल्वे स्थानकाजवळ अचानक बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसचे डबे इंजिनपासून वेगळे झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी हानी झालेली नाही. मात्र, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या घटनेनंतर रेल्वेचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केलं.

amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
cargo vehicle caught fire on Mumbai Ahmedabad National Highway
महामार्गावर मालवाहतूक वाहनाला भीषण आग, मालजीपाडा वासमाऱ्या पुलाजवळील घटना

माहितीनुसार, बिहारमधील खुदीराम बोस पूसा रेलवे स्थानकाजवळ ही घटना घडली. यानंतर रेल्वे अधिकारी त्वरीत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मतदकार्य करत घटनेची माहिती घेतली. यावेळी बिहार संपर्क क्रांती एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. पण डबे आणि इंजिन वेगळे झाल्यानंतर कशीतरी ट्रेन थांबण्यात यश आलं. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर रेल्वेचे डबे पुन्हा इंजिनला जोडत रेल्वे पुढे रवाना करण्यात आली.

हेही वाचा : Bihar Caste Reservation : मोठी बातमी! बिहारमधील ६५ टक्के आरक्षण स्थगितीच्या HCच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

व्हिडीओमध्ये रेल्वेचे इंजिन आणि डब्बे असे दोन वेगळे भाग झाल्याचे दिसून आले. तसेच रेल्वेमधून खाली उतरल्यानंतर काही लोक घटनेचा व्हिडिओ बनवतानाही दिसले. दरम्यान, इंजिन आणि रेल्वे डब्याला जोडणारे कपलिंग तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती सांगितली जाते. या घटनेनंतर सुमारे दीड तास गाडी थांबली होती. यानंतर इंजिनला रेल्वे डब्बा जोडण्यात आल्यानंतर ही गाडी रवाना करण्यात आली. दरम्यान, ही घटना तांत्रिक बिघाडामुळे घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे कोणतीही मोठी घटना घडली नसली तरी जवळपास तीन ते चार तास गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालच्या न्यू जलपाईगुडीजवळ रेल्वेचा भीषण अपघात घडल्याची घटना घडली होती. त्या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता १८ जुलै रोजी उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात घडला होता. या घटनेनंतर आज पुन्हा एकदा बिहारमधील समस्तीपुर जिल्ह्यात रेल्वेची मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया रेल्वे प्रशासनाची समोर आलेली नाही.