Bihar Saran Fake Doctor : यूट्यूबवर व्हिडीओ पाहून अनेकवेळा धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलेलं आहे. आता अशीच एक घटना बिहारच्या सारण जिल्ह्यामधून समोर आली आहे. एका डॉक्टरांनी यूट्यूबवर व्हिडीओ पाहून रुग्णाची शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

नेमकी घटना काय घडली?

बिहारमधील सारण जिल्ह्यातील भुवलपूर गावातील चंदन साह यांनी आपल्या १५ वर्षीय मुलाला पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे गरखा मोतीराजपूर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. यानंतर १५ वर्षीय मुलाच्या पित्त मूत्राशयाची शस्त्रक्रिया करावी लागेल असं संबंधित डॉक्टरने सांगितल्याचं चंदन साह यांनी म्हटलं आहे. त्यानंतर चंदन साह यांनी मान्य केलं आणि त्यांच्या मुलाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल केलं. त्यानंतर संबंधित डॉक्टरने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबांनी केला आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

हेही वाचा : Uttar Pradesh Kushinagar : मन सुन्न करणारी घटना! हॉस्पिटलचं ४ हजारांचं बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने वडिलांनी तीन वर्षांच्या मुलाला विकलं

शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलाची प्रकृती बिघडल्याचं पाहून डॉक्टरही घाबरले. त्यानंतर मुलाला पाटणा येथील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं. त्यासाठी डॉक्टरने रुग्णवाहिकेची व्यवस्थाही केली. मात्र, तोपर्यंत शस्त्रक्रिया केलेल्या मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मधौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी घडला.

मुलाच्या कुटुंबांचे गंभीर आरोप

मुलाच्या कुटुंबांनी गरखा मोतीराजपूर येथील एका खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरवर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांनी मुलाची शस्त्रक्रिया करताना आपल्याला बाहेर काहीतरी कामानिमित्त पाठवलं होतं. यावेळात डॉक्टरने शस्त्रक्रिया या संदर्भात यूट्यूबवर व्हिडीओ पाहून शस्त्रक्रिया केल्याचा गंभीर आरोप केला आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर रक्तस्त्रावर थांबत नसल्यामुळे आणि मुलाची तब्येत खालावत चालल्यामुळे डॉक्टरने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात सांगितलं. मात्र, तो पर्यंत मुलाचा मृत्यू झाला. हे पाहून डॉक्टर पळून गेल्याचा आरोप मुलाच्या कुटुंबांनी केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे त्या मुलाच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असल्याची माहिती सांगितली जात आहे.

Story img Loader