बिहारमध्ये एक विचित्र लग्न सोहळा पार पडला आहे. या प्रकरणी पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे, बिहार राज्यात उपवर मुलांचं अपहरण करून त्यांचा जबरदस्ती विवाह करण्यात येत असल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. आताही अशाच पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. टाईम्स नाऊने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित तरुण गौतम कुमार हा नुकताच बिहार लोकसेवा आयोगातील परीक्षेत पास झाला असून शिक्षकाची नोकरी त्याला मिळाली आहे. वैशाली जिल्ह्यातील महिया मलपूर गावातील तो असून त्याची त्याला रेपुरा येथील उतक्रमित मध्य विद्यालयात नियुक्ती झाली. नोकरी मिळल्यानंतर गौतम कुमार शाळेत शिकवत असताना त्यांना शाळेतूनच उचलण्यात आलं. शाळेतून अपहरण करून एका गाडीतून त्यांना नेण्यात आलं.

राजेश राय यांनी गौतम कुमारचं त्यांच्या शाळेतूनच बुधवारी दुपारी अपहरण केलं. अपहरणानंतर राजेश राय यांची मुलगी चांदणी हिच्याशी गौमतचा विवाह लावून दिला. या प्रकराला बिहारमध्ये पकडौआ विवाह म्हटलं जातं. अशाप्रकारचे अनेक विवाह बिहारमध्ये होत असतात. दरम्यान, गौतमने लग्नाला नकार दिल्याने त्याच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले होते. याविरोधात गावकऱ्यांनी ताजपूर-हाजिपूर राज्य महामार्ग – ४९ पाच तासांसाठी रोखून धरला होता.

पोलिसांनी याप्रकरणी वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांचा रास्तारोको थांबवला आणि अपहरण झालेल्या शिक्षकाला लवकरात लवकर शोधून काढण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं असून एकाला अटक करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar teacher abducted forced to marry kidnappers daughter at gunpoint sgk