बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये प्रेम प्रकऱणातून मुलीच्या कुटुंबीयांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या करुन गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पीडित तरुणाच्या संतप्त कुटुंबीयांनी आरोपींच्या घऱाबाहेरच मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत आपला आक्रोश व्यक्त केला. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

पीडित तरुण सौऱभ कुमारचा शेजारच्या गावात असणाऱ्या आपल्या प्रेयसीच्या घरात आढळला. थेट घऱात येण्याची हिंमत केल्याने तरुणीच्या संतप्त नातेवाईकांकडून सौरभला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सौरभच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देत खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्याच रात्री उपचारादरम्यान त्याचं निधन झालं. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि याप्रकरणी तपास सुरु केला.

“प्राथमिकदृष्ट्या प्रेमप्रकऱणातून हत्या झाल्याचं दिसत आहे. त्याला मारहाण करत गुप्तांग कापण्यात आलं. पोस्टमॉर्टम केला जात असून त्यानंतरच नेमकी माहिती मिळेल,” अशी माहिती मुझफ्फरपूरचे (शहर) पोलीस अधिक्षक राजेश कुमार यांनी दिली आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेले कुटुंबीय आणि नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घरावर हल्ला केला. इतकंच नाही तर त्यांच्या घऱाबाहेरच मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे. पोलिसांनी सौरभच्या हत्येप्रकरणी सुशांत पांडे नावाच्या एका व्यक्तीला अटक केली आहे.

Story img Loader