बिहारच्या तपास यंत्रणांनी केलेल्या छापेमारीत तीन सरकारी अधिकाऱ्यांच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. किशनगंजमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्याशी संबंधित पाटणासह किशनकंजमधील काही ठिकाणांवर अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
मुकेश अंबानींच्या मुलाने विकत घेतले दुबईतील आजपर्यंतचे सर्वात महागडे घर; किंमत ऐकून थक्क व्हाल
राय यांच्या घरावरील छापेमारीदरम्यान भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी कनिष्ठ अभियंता आणि रोखपालाच्या घरी लपवून ठेवल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे तपास यंत्रणांनी कनिष्ठ अभियंता आणि रोखपालाच्या घरी देखील छापेमारी केली.
किशनगंजमधील रोखपालाच्या निवासस्थानी झालेल्या छापेमारीदरम्यान अधिकाऱ्यांना ३ कोटींची बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली. त्याचवेळी पाटणातील राय यांच्या इंद्रपुरी रोडवरील निवासस्थानावरुन १ कोटीची रोख जप्त करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात तपास यंत्रणांकडून आणखी काही ठिकाणांवर छापेमारी करण्यात येत आहे.