Women Runs With Loan Agent In Bihar: बिहारमधील एक महिला तिच्या दारुड्या पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून, कर्ज वसूल करणाऱ्या एजंटशी पळून गेल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना बिहारमधील जमुई जिल्ह्यात घडली आहे. कर्ज वसूल करणाऱ्या एजंटबरोबर पळून गेलेल्या महिलेचे नाव इंद्रा असे असून, तिचे नकुल याच्याशी २०२३ मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पती सतत मद्यपान करुन तिला मारहाण करायचा. यादरम्यान, तिची भेट पवन कुमार यादव या कर्ज वसूल करणाऱ्या एजंटशी झाली. हा एजंट त्यांच्या घरी कर्ज वसुलीसाठी यायचा. कालांतराने, महिलेची एजंटशी मैत्री झाली आणि शेवटी मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान ही महिला आणि कर्ज वसुली एजंटमे पाच महिने त्यांचे नाते सर्वांपासून लपवून ठेवले होते. त्यानंतर ते ४ फेब्रुवारी रोजी पश्चिम बंगालच्या आसनसोलला पळून गेले. त्यानंतर जमुईला परतण्यापूर्वी ते काही दिवस इंद्राच्या मावशीच्या घरी राहिले होते. पुढे ११ फेब्रुवारी रोजी त्यांनी एका मंदिरात लग्न केले. त्यावेळी लग्नाला अनेक लोक उपस्थित होते असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. दरम्यान त्यांचे लग्न पार पडल्यानंतर काही वेळातच लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पोलीस सुरक्षेची मागणी
दरम्यान कर्ज वसुली एजंट पवण कुमारच्या कुटुंबीयांनी हे लग्न मान्य केले असले तरी इंद्राच्या कुटुंबीयांनी याला विरोध केला आहे. त्यांनी पवण कुमार याच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. असे असले तरी, इंद्राने स्वतःच्या इच्छेने पवनशी लग्न केले असल्याचे पोलिसांना सांगितले आहे. दुसरीकडे पवण कुमारे त्याला आणि इंद्राला तिच्या कुटुंबीयांकडून धोका असल्याचे म्हणत पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे.
मद्यापी पतींना कंटाळून दोन महिलांचे एकमेकींशी लग्न
जानेवारीमध्ये, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील दोन महिलांनी त्यांच्या मद्यपी पतींना सोडून एकमेकांशी लग्न केले होते. गुंजा आणि कविता यांनी देवरिया येथील शिव मंदिरात लग्न केले होते, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.
“आमच्या पतींच्या मद्यपान आणि गैरवर्तनामुळे आम्हाला खूप त्रास होत होता. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. आम्ही आता गोरखपूरमध्ये राहण्याचा आणि उदरनिर्वाहासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे गुंजाने पीटीआयला सांगितले.