SC Verdict on Bilkis Bano : मे २००२ मध्ये गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीत बिल्किस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिच्या कुटुंबियांचीही हत्या करण्यात आली. याप्रकरणी २००८ साली विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु, १५ ऑगस्ट २०२२ साली गुजरात सरकारने त्यांची शिक्षा रद्द करून त्यांची सुटका केली. या सुटकेच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन ही शिक्षामाफी रद्दबातल केली आहे. यावर बिल्किस बानोने आता प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयामुळे मी आता पुन्हा श्वास घेऊ शकते, अशी प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. इंडियन एक्स्प्रेसने बिल्किस बानोच्या वकिलांमार्फत संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“आज खरोखरच माझ्यासाठी नवीन वर्ष आहे. माझ्या डोळ्यांत समाधानाचे अश्रू आहेत. गेल्या दीड वर्षांत मी पहिल्यांदाच हसले आहे. निकाल लागल्यानंतर मी माझ्या मुलांना मिठी मारली. माझ्या मनावरचं मोठं दडपण दूर झालंय, आता जीव भांड्यात पडला आहे आणि मी मोकळा श्वास घेऊ शकते आहे”, या आशयाचं वक्तव्य बिल्किस बानोने केलं. तसंच, “माझ्यासाठी हाच न्याय वाटतो. मला, माझ्या मुलांना आणि स्त्रियांना समान न्याय देण्याच्या वचनाची आशा दिल्याबद्दल मी माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानते”, असंही बिल्किस बानो म्हणाली.

हेही वाचा >> Bilkis Bano Case : “आम्हाला शंका आहे की…”, बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर पीडितेच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया

या द्वेषाच्या काळात सर्वांनी सहकार्य केलं

बिल्किस बानोच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्यांचेही तिने आभार मानले. ती म्हणाली, “मी आधीही म्हणाले होते आणि आज पुन्हा सांगते, माझ्यासारख्या महिलेचा प्रवास एकट्याने कधीच होऊ शकत नाही. माझे पती आणि माझी मुले माझ्यासोबत आहेत. या द्वेषाच्या काळात मला माझ्या मित्रांनी खूप प्रेम दिलं आणि या कठीण काळात माझ्यासोबत ते उभे राहिले. माझ्याकडे एक अधिवक्ता शोभा गुप्ता या असाधारण वकील आहेत. त्या २० वर्षांहून अधिक काळ माझ्यासोबत राहिल्या.”

हेही वाचा >> पाच महिन्यांची गरोदर असताना सामूहिक बलात्कार, कुटुंबातल्या सदस्यांची हत्या; २२ वर्षे लढणाऱ्या बिल्किस बानोची कहाणी

माझं धैर्य संपलं होतं, पण…

“दीड वर्षापूर्वी, १५ ऑगस्ट २०२२ रोजी ज्यांनी माझे कुटुंब उद्ध्वस्त केले होते आणि माझ्या अस्तित्वाला धक्का पोहोचवला होता, त्या आरोपींना सोडून देण्यात आलं होतं. तेव्हा मी पूर्णपणे कोसळले होते. मला वाटलं की आता माझं धैर्य संपलं आहे. पण अनेकांनी मला सहकार्य केलं. भारतातील हजारो सामान्य लोक आणि महिला पुढे आल्या. या महिला माझ्यासोबत उभे राहिल्या, माझ्या बाजूने बोलल्या आणि सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली”, असंही बानो म्हणाल्या.

सर्वांसमोर कायदा समान

“देशभरातून सहा हजार लोकांनी आणि मुंबईतील ८ हजार ५०० लोकांनी अपील लिहिली; १० हजार लोकांनी खुले पत्र लिहिले. तसेच कर्नाटकातील २९ जिल्ह्यांतील ४० हजार लोकांनी पत्र लिहिले. या प्रत्येक लोकांसाठी, तुमच्या मौल्यवान एकता आणि सामर्थ्याबद्दल मी खूप आभार मानते. फक्त माझ्यासाठीच नाही तर भारतातील प्रत्येक स्त्रीला न्याय मिळवून देण्याची, संघर्ष करण्याची इच्छाशक्ती तुम्ही मला दिली. मी आपली आभारी आहे. माझ्या स्वतःच्या आणि मुलांच्या आयुष्यासाठी या निकाला महत्त्वपूर्ण आहे. आज माझ्या हृदयातून निघणारी प्रार्थना सोपी आहे, सर्वांसमोर कायदा समान आहे”, असंही बानो म्हणाल्या.