Ratan Tata Bill Ford Jaguar Land Rover Deal: जवळपास १६ वर्षांपूर्वी रतन टाटांनी टाटा समूहासाठी एक मोठा करार यशस्वीरीत्या पूर्ण केला होता. फोर्डच्या मालकीचे जॅग्वार आणि लँड रोव्हर हे दोन बलाढ्य ब्रँड टाटांनी आपल्या पंखांखाली घेतले होते. उद्योग जगतातील हा एक मोठा व्यवहार ठरला होता. त्यावेळ या व्यवहाराची बरीच चर्चाही पाहायला मिळाली होती. पण हा व्यवहार स्वत: रतन टाटांसाठी प्रचंड जिव्हाळ्याचा विषय होता. याचं कारण त्याच्या १० वर्षं आधी घडलेल्या एका घटनेमध्ये आहे. रतन टाटांना प्रचंड जिव्हारी लागलेल्या त्या घटनेमुळे २००८ साली फोर्डसोबत झालेला व्यवहार हा एक प्रकारे त्यांना झालेल्या मानसिक जखमेवरचा उपचारच होता!

नेमकं काय घडलं होतं तेव्हा?

या दोन्ही घटना आणि रतन टाटांसाठी जिव्हाळ्याचा ठरलेला हा विषय याबाबत बिर्ला प्रिसीजन टेक्नोलॉजीजचे संचालक वेदांत बिर्ला यांनी दोन वर्षांपूर्वी एक सविस्तर पोस्ट तेव्हाच्या ट्विटरवर शेअर केली होती. आता ही पोस्ट पुन्हा व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये वेदांत बिर्ला यांनी १९९८ सालचा तो प्रसंग आणि २००८ साली झालेला व्यवहार या दोन्ही बाबींवर सविस्तर भाष्य केलं आहे.

SIMI, 2008 Malegaon blasts,
२००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोटामागे सिमीचा हात, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा विशेष न्यायालयात दावा
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Narayan Singh soldier body returns home after 56-year
५६ वर्षांनी सैनिकाच्या मृतदेहाचे अवशेष अंतिम संस्कारासाठी कुटुंबियांच्या ताब्यात, खिशातल्या ‘त्या’ कागदामुळे ओळख पटली
'More Than 40 Years Ago, With Princely Salary Of ₹1,300': Nostalgic Post Of Former IAS Officer's First Job In Mumbai
“पहिल्या नोकरीत पगार कमी असतो पण…” माजी आयएएस अधिकाऱ्यानं ४० वर्षांपूर्वीच्या पहिल्या नोकरीचा अनुभव केला शेअर
Two arrested by crime branch in murder case Pune news
खून प्रकरणात चार वर्ष पोलिसांना गुंगारा- गुन्हे शाखेकडून दोघे गजाआड
Aakriti Chopra
Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोच्या सहसंस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा, दोन वर्षांत पाच जणांनी सोडली कंपनी!
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…

वेदांत बिर्ला यांनी शेअर केलेल्या पोस्टनुसार, या सगळ्याला सुरुवात झाली ती १९९८ साली. टाटा मोटर्सनं तेव्हा ‘टाटा इंडिका’ ही त्यांची पहिली पूर्णपणे भारतीय बनावटीची कार तेव्हा लाँच केली होती. हा रतन टाटा यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. पण तेव्हा टाटा इंडिकाला बाजारात अपयशाचा सामना करावा लागला. टाटांचा ड्रीम प्रोजेक्ट पिछाडीवर पडू लागला. बाजारात टाटा इंडिकाची घटती मागणी व त्याहून खाली जाणारी विक्री पाहाता रततन टाटांनी त्यांच्या कारच्या व्यवसायाची पदार्पणाच्या पहिल्या वर्षभरातच विक्री करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी १९९९ साली अमेरिकेतली कार उद्योगातील बलाढ्य कंपनी फोर्डशी संपर्क साधला.

ratan tata famous quotes
रतन टाटांच्या जीवनविषयक दृष्टीकोनच या विधानांमधून सपष्ट होतो! (फोटो – रॉयटर्स संग्रहित)

रतन टाटा व बिल फोर्ड यांची ‘ती’ भेट!

रतन टाटा व बिल फोर्ड यांच्यात तेव्हा यासंदर्भात अमेरिकेत झालेल्या भेटीबाबत नंतर बरंच बोललं गेलं. टाटा त्यांच्या टीमसमवेत फोर्डचे प्रमुख बिल फोर्ड यांना भेटायला अमेरिकेत गेले. ठरल्याप्रमाणे बैठकही सुरू झाली, पण या बैठकीत रतन टाटांचा अवमान झाला!

त्याचं झालं असं, की टाटा इंडिका आणि त्यासंदर्भातले सगळे आकडे पाहिल्यानंतर बिल फोर्ड यांनी रतन टाटांना अप्रत्यक्षपणे चक्क सुनावलं. टाटानं कसं कार उत्पादन उद्योगात यायलाच नको होतं असं फोर्ड त्यांना सांगू लागले. त्यावेळी त्या टीममध्ये असणाऱ्या प्रवीण काडले यांच्या हवाल्याने मनीकंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, तेव्हा तर बिल फोर्ड यांनी रतन टाटांना असंही म्हटलं होतं की, “तुम्हाला काहीही माहिती नाही, मग तुम्ही प्रवासी कार उत्पादनाच्या क्षेत्रात उतरलातच का?” त्यामुळे टाटांचा कार विभाग खरेदी करून फोर्ड त्यांना मदतच करेल, असंही बिल फोर्ड तेव्हा म्हणाले.

…आणि रतन टाटांनी मनाशी पक्का निर्धार केला!

“तेव्हा टाटा व फोर्ड यांच्यात करार होऊ शकला नाही. त्या बैठकीत आलेल्या वाईट अनुभवाची चीड रतन टाटांच्या मनात होती. त्यातून त्यांनी कार उद्योगावर अधिक लक्ष केंद्रीत केलं. कार उत्पादन विभागाची विक्री करायची नाही, हे त्यांनी मनाशी पक्कं केलं”, असं वेदांत बिर्ला यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Ratan Tata: “माफ करा, माझा कुत्रा आजारी आहे”, रतन टाटांनी प्रिन्स चार्ल्सकडून मिळणारा पुरस्कारही नाकारला होता!

रतन टाटा अमेरिकेहून परत आल्यानंतर पुढच्या दहा वर्षांत जे घडलं, तो कार उत्पादन क्षेत्रातला एक चमत्कारच ठरला. त्यानंतर बरोबर ९ वर्षांनी, म्हणजेच २००८ सालच्या आर्थिक महामंदीच्या काळात फोर्ड कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. तेव्हा मग रतन टाटा त्यांच्या मदतीला गेले व त्यांनी फोर्डना त्यांचे जॅग्वार व लँड रोव्हर हे दोन ब्रँड खरेदी करण्याचा प्रस्ताव बिल फोर्ड यांच्यासमोर ठेवला. एवढंच नाही, रतन टाटांनी त्याच वर्षी तब्बल २.३ बिलियन डॉलर्स रक्कम रोख चुकती करून हा करार पूर्ण केल्याचंही सांगितलं जातं.

…आणि मग बिल फोर्ड टाटांना म्हणाले, ‘तुम्ही माझी मोठी मदत केली’

दहा वर्षांनी इतिहासाची पुनरावृ्त्ती झाली. फक्त यावेळी दोघांच्या जागा बदलल्या होत्या. “फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड या करारानंतर रतन टाटांचे आभार मानत म्हणाले, ‘जॅग्वार व लँड रोव्हर खरेदी करून माझी मोठी मदत केलीत'”, असं प्रवीण काडले यांनी सांगितल्याचं मनीकंट्रोलच्या वृत्तात म्हटलं आहे.

“त्यानंतर रतन टाटांनी जॅग्वार व लँड रोव्हरला बाजारपेठेतील एक सर्वाधिक फायद्यात चालणारा ब्रँड बनवला. आज टाटा समूहाच्या अर्थपुरवठ्याचा महत्त्वाचा हिस्सा या दोन ब्रँड्सकडून पुरवला जातो”, असंही वेदांत बिर्ला यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.