Bill Gates on Steve Jobs: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे ॲपलचे सहसंस्थापक सिव्ह जॉब्स यांच्याशी फार बोलत नसत, जॉब्सबद्दल गेट्स यांच्या मनात एक वेगळाच दरारा होता. एका पुस्तकातून बिल गेट्स हे स्टिव्ह जॉब्सचा मत्सर करत असल्याचे समोर आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या पत्रकार अनुप्रीता दास यांनी लिहिलेल्या ‘बिलिनेयर, नर्ड, सेव्हियर, किंग: बिल गेट्स अँड हिज क्वेस्ट टू शेप अवर वर्ल्ड’ (BILLIONAIRE, NERD, SAVIOR, KING: Bill Gates and His Quest to Shape Our World) या पुस्तकात गेट्स आणि जॉब्स यांच्याबद्दल काही खुलासे केले आहेत. १९९७ साली मॅकव्हर्ल्ड बोस्टन इव्हेंटचा एक किस्सा या पुस्तकात सांगितला आहे.

१९९७ साली बिल गेट्स हे ॲपलमध्ये १५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. त्याचीच घोषणा बोस्टन येथील इव्हेंटमध्ये करण्यात येणार होती, मात्र या इव्हेंटला हजर राहणे बिल गेट्स यांनी टाळले होते. त्यांनी या सभेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Navneet Rana, Navneet Rana on EVM issue,
‘राजीनामा देण्‍यास तयार, पण…’; नवनीत राणांचे आव्‍हान खासदार वानखडेंनी स्‍वीकारले
Shailendra kumar bandhe Success Story
Success Story: शिपायाची नोकरी ते अधिकारी, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याचा प्रेरणादायी प्रवास
Cyber ​​scam under the pretext of wedding invitation Nagpur news
विवाह निमंत्रणपत्रिकेच्या बहाण्याने सायबर घोटाळा; ‘एपीके फाइल’ने राज्यात अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
Municipal Corporation files case against two people for putting up illegal hoardings in Pimpri Pune print news
पिंपरी: बेकायदा फलक लावणाऱ्या दाेघांवर गुन्हे; ४६ हजारांचा दंड वसूल

हे वाचा >> Pakistan Extreme Weather: हवामान बदलामुळे पाकिस्तानमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले; अल्पवयीन मुलींची लग्न लावण्याचे कारण काय?

“ऑगस्ट १९९७ साली बोस्टनमधील ॲपलच्या मॅकवर्ल्ड इव्हेंटमध्ये स्टिव्ह जॉब्स संपूर्ण स्टेजवर चौफेर फिरत आवेशपूर्ण संबोधन करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते. त्याचवेळी बिल गेट्स सिएटलमध्ये बसून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे सर्व खिन्नपणे पाहत होते”, असे या पुस्तकात म्हटले आहे.

या पुस्तकात पुढे लिहिले, “जॉब्स अतिशय सहजतेने श्रोत्यांशी संवाद साधत होते. भाषण करताना योग्य ठिकाणी थांबणे, मध्ये मध्ये विनोदाची फोडणी देणे, रंगभूमीवरील एखाद्या कसलेल्या कलाकाराप्रमाणे स्टिव्ह जॉब्स यांचे बोलणे होते. बिल गेट्स यांना याचे कौतुकही वाटत होते आणि मत्सरही. बिल गेट्स यांनी त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या सहकाऱ्याला विचारले की, हा (स्टिव्ह जॉब्स) हे कसे काय करतो?”

बिल गेट्स यांनी हे जाहीरपणे कबूल केले होते की, स्टिव्ह जॉब्स जेव्हा मंचावरून श्रोत्यांना काही सूचना देतात, तेव्हा त्या नैसर्गिक वाटत असतात.

बिल गेट्स यांनी पुढे म्हटले होते की, जाहीर कार्यक्रमाआधी जॉब्सला तालीम करताना पाहणे खूप मजेशीर वाटायचे. तो स्टिव्ह जॉब्सच्या अलौकिक बुद्धिमत्तेचा भाग होता. पण जेव्हा मंचावर बोलायची वेळ यायची तेव्हा तो इतक्या सहजतेने सादर करायचा की, त्याला ते मंचावरच सुचले आहे, असे वाटायचे.

हे ही वाचा >> Ukrainian incursion: आता जगभर युद्ध भडकणार? रशियाच्या संसदेतील खासदाराचं धक्कादायक विधान; म्हणाले, “तिसऱ्या महायुद्धाच्या…”

स्टिव्ह जॉब्सबद्दल बोलताना गेट्स पुढे म्हणाले, तो लोकांना मंत्रमुग्ध करणारा एक मोठा जादूगार होता. मी त्याच्यापेक्षा लहान जादूगार होतो, म्हणून मी त्याच्या प्रभावाखाली कधी आलो नाही. पण स्टिव्ह जॉब्स लोकांना आपल्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध करताना मी अनेकदा पाहिले आहे. त्यानंतर मी समोरील श्रोत्यांकडे पाहायचो तेव्हा ते विस्मयचकित होऊन जॉब्सकडे नजरा लावून बसलेले दिसायचे, हे चित्र माझ्या मनात जॉब्सबद्दल हेवा निर्माण करायचे.

Story img Loader