कॅलिफोर्निया राज्याने राज्यातील जातभेद नष्ट करण्यासाठीचं विधेयक मंजूर केलं आहे. या विधेयकाचं रुपांतर जर कायद्यात करण्यात आलं तर अशा प्रकारचा कायदा करणारं हे जगातलं पहिलं राज्य ठरेल. कॅलिफोर्निया राज्याच्या सिनेटने सीनेटर आयशा वहाब यांनी हे अँटी कास्ट बिल एसबी मंजूर केलं आहे. सदनात झालेल्या मतदान या विधेयकाच्या बाजूने ३४ मतं पडली आहेत तर विधेयकाच्या विरोधात एक मत पडलं आहे. या विधेयकावर राज्यपालांनी सही केल्यानंतर या विधेयकांचं रुपांतर कायद्यात होणार आहे.

या विधेयकात काय तरतुदी आहेत?

कॅलिफोर्नियाच्या सीनेटर आइशा वहाब यांनी सादर केलेल्या विधेयकात जातीभेद नष्ट करण्याची महत्त्वाची तरतूद आहे. तसंच सगळ्या लोकांना समान निवास व्यवस्था, शिक्षण आणि तंत्रज्ञानात यातील सर्व व्यवस्था समान मिळतील यांचीही तरतूद आहे.
अमेरिकी सीनेटमध्ये अँटी कास्ट बिल पास झाल्यानंतर कॅलिफोर्निया हे असं पाऊल उचलणारं अमेरिकेतलं पहिलं राज्य ठरलं आहे. या विधेयकाचं रुपांतर जर राज्यपालांच्या सहीनंतर कायद्यामध्ये करण्यात आलं तर कॅलिफोर्नियात जातीभेद करणं हा गुन्हा ठरु शकणार आहे आणि जर कुणी असं केलं तर त्या व्यक्तीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Hemlata Patil
Hemlata Patil : काँग्रेसला मोठा धक्का? ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील पक्ष सोडणार?
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Shiv Sena UBT to contest local elections independently
महापालिका निवडणुकांआधी मविआत फूट? ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत स्वबळावर लढणे कितपत शक्य?
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?
Bihar Politics
Bihar Politics : प्रशांत किशोर ‘बीपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी मैदानात, पण बिहारमधील नितीश कुमार सरकार आंदोलनाबाबत एवढं बेफिकीर का?

अमेरिकेच्या सीएटल कौन्सिलमध्ये अलीकडेच जातिभेदावर बंदी आणणारा पहिला कायदा संमत झाला. असा कायदा संमत करणारे सीएटल हे अमेरिकेतील पहिलेवहिले शहर ठरले. या कायद्यासाठीच्या सर्व लढ्याचे श्रेय एका भारतीय महिलेला जाते, तिचे नाव क्षमा सावंत. जातीआधारित भेदभावावर बंदीचा ठराव अमेरिकेच्या सीएटल शहराच्या कौन्सिलमध्ये आणणारी आणि तो स्वतः लिहिणारी ही अमेरिकन कौन्सिलची पहिली भारतीय महिला सदस्या आहे. सीएटल नगर परिषदेमध्ये हा कायदा ६ विरुद्ध १ अशा फरकाने संमत झाला होता.

जॉर्जिया मध्ये ‘हिंदूफोबिया’ला विरोध करणारा ठराव मंजूर

एकीकडे जातीभेद नष्ट करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल कॅलिफोर्नियात उचललं जात असताना जॉर्जियामध्ये हिंदफोबियाला विरोध करणारा ठराव मंजूर झाला आहे. जॉर्जिया विधानसभेने २७ मार्च रोजी ‘हिंदूफोबिया’ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आणि जगभरातील हिंदूंचे या ठारावाने लक्ष वेधले. अशाप्रकारचा ठराव मंजूर करणारे जॉर्जिया अमेरिकेतील पहिले राज्य ठरले आहे. रिपब्लिकन पक्षाचे लोकप्रतिनिधी लॉरेन मॅकडॉनल्ड, टॉड जोन्स, रिक जॅस्पर्स, डेव्हिड क्लार्क आणि ब्रेंट कॉक्स यांनी या ठरावाला पाठिंबा दिला. मॅकडॉनल्ड आणि जोन्स यांनी हा ठराव मांडला होता. दोघेही अटलांटा शहराचे प्रतिनिधित्व करतात. जॉर्जियामधील सर्वाधिक हिंदू समुदाय अटलांटामध्ये राहतो. त्या पार्श्वभूमीवर अटलांटाच्या प्रतिनिधींसाठी हा ठराव राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण होता. हा ठराव आणण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिन्याभरापूर्वीच अमेरिकेतील सिएटल शहराच्या नगरपरिषदेने भेदभावाविरोधी धोरणात ‘जातीभेदाचाही’ समावेश केला होता.

Hinduphobia ठरावात काय म्हटले?

‘हिंदूफोबिया आणि हिंदूविरोधी कट्टरता’ हा ठराव मांडतांना सांगितले गेले की, सनातन धर्म (हिंदू धर्म) आणि हिंदूच्या विरोधात काही घटक घातक कारवाया करत आहेत आणि हिंदूंना अपमानास्पद वागणूक देत आहेत. या भेदभावावरून त्यांच्या मनातली भीती आणि द्वेष दिसून येत आहे. हिंदू धर्म हा जगातला सर्वात मोठा आणि सर्वात जुना धर्म असून जगभरातील १०० हून अधिक देशात १.२ अब्ज हिंदू धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. विविध देशांत वास्तव्य करत असताना तेथील मूल्यांचा स्वीकार, परस्परांबद्दल सौहार्द आणि शांततापूर्ण पद्धतीचा व्यवहार हिंदूजनांकडून केला जातो.

या ठरावात पुढे म्हटले की, अमेरिकेच्या बहुढंगी संस्कृतीमध्ये ४ दशलक्षहून अधिक हिंदू वास्तव्य करत आहेत. तसेच अमेरिकन-हिंदू समुदायाने अमेरिकेच्या विविध क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. उदाहरणार्थ, वैद्यकीय क्षेत्र, आयुर्वेद, योग, खाद्यसंस्कृती, ध्यानधारणा, संगीत आणि कला यांसारख्या अनेक क्षेत्रात हिंदू धर्मीयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Story img Loader