Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी भारतात पाच वर्षांपासून बंदी घालतेला चीनी ब्रँड रिलाँच केला आहे. चीनमधील आघाडीची कंपनी शीन भारतात रिलायन्सच्या मदतीने परतली आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटिडेन गेल्यावर्षीच शीन या कंपनीसह भागिदारी केली होती. रिलायन्सने त्याचमुळे भारतात बंदी असलेला ब्रँड परत आणला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीन कंपनीवर पाच वर्षांपूर्वी घालण्यात आली बंदी

शीन आणि रिलायन्स यांची भागिदारी नेमकी कशी आहे? हे स्पष्ट झालेलं नाही. शीन कदाचित रिटेल आणि निर्यात अशा दोन्ही माध्यमांमध्ये असेल असं दिसतं आहे. पाच वर्षांपूर्वी शीन या कंपनीवर बंदी घालण्यात आली तेव्हापासून अत्यंत मर्यादित स्वरुपात अॅमेझॉनवर या ब्रँडचे कपडे आणि इतर उत्पादनं मिळत होती. जून २०२० मध्ये भारत सरकारने २०२० मध्ये सीमा वादामुळे भारताने ५९ चीनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यात शीन हा ब्रँडही होता. राष्ट्रीय सुरक्षा आणि डेटाशी संबंधित चितेंमुळे ही बंदी घालण्यात आली होती. सरकारला ही चिंता होती की अॅप्स द्वारे भारतीयांचा डेटा चीनमध्ये लीक होऊ शकतो. आता रिलायन्सच्या माध्यमातून ही कंपनी भारतात परत येते आहे.

शीन ब्रँड परत येतो आहे, वाद काय?

भारत सरकारने बंदी घातलेली शीन ही चायनीज कंपनी पाच वर्षांनी भारतात रिलायन्सच्या साथीने पुनरागमन करते आहे. शीनची खासियत ही आहे की विविध प्रकारचे स्वस्त कपडे आणि इतर उत्पादनं ही कंपनी तयार करते. चीनमधली शीन ही कंपनी फास्ट फॅशन कंपनीचा ब्रँड आहे. या कंपनीचं मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिलं आहे.

शीन ही कंपनीला सुरुवातीला एक शिपिंग कंपनी होती

शीन सुरुवातीला एक शिपिंग कंपनी म्हणून काम करत होती. ही कंपनी ग्वांगझूच्या होलसेल बाजारातून कपडे घेऊन ते विकण्याचं काम करत होती. फास्ट फॅशन रिटेलर शीनमध्ये डेटा गोपनीयता, ट्रेडमार्क या सगळ्या गोष्टींवरुन वाद निर्माण झाला होता. चीन मधल्या अल्पसंख्याकाचा मुद्दाही समोर आला होता. हे सगळे वाद निर्माण झाले त्यानंतर भारतात या कंपनीवर बंदी घालण्यात आली.

शीन कंपनीवर झाली होती कारवाई

ऑक्टोबर २०२२ मध्ये शीन या कंपनीला डेटा ब्रीचचा सामना करावा लागला होता. कारण जवळपास ३ कोटी लोकांचा डेटा चोरी झाला होता. डेटा चोरी झाल्यानंतर शीनच्या मूळ कंपनीचा जोएटोपला १ कोटी ९० लाख रुपयांचा दंड भरावा लागला. शीनवर लेव्ही, डॉ मार्टेंस, राल्फ रॉलेन यांसारख्या लोकप्रिय ब्रांडच्या डिझाईनची चोरी केल्याचा आरोप होता. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात खटलाही चालवण्यात आला होता.