संपूर्ण देशाला मंदीच्या आणि आरोग्य आणीबाणीच्या खाईत लोटणाऱ्या करोना व्हायरसविषयी आणखी एक नवी माहिती समोर आली आहे. करोना विषाणू हा मानवनिर्मित विषाणू असून त्याचा जैवशस्त्र (Bioweapon) म्हणून वापर करण्याकरता चीनने या विषाणूची उत्पत्ती केली होती, असा दावा वुहान इन्स्टिट्युटमधील एका संशोधकाने केला आहे.

२०१९ च्या सुरुवातीपासून करोना विषाणूने संपूर्ण जगभर आपले हातपाय पसरले होते. त्यानंतर २०१९ ते आतापर्यंत करोनाची धास्ती अद्यापही गेली नाही. २०१९, २०२० आणि २०२१ हे तीनही वर्ष संपूर्ण जगासाठी भयानक स्वप्नवत होते. कारण, या तीन वर्षांत जगाने जे अनुभवलं त्याचा आता पुनरूच्चार करणंही लोक टाळतात. चीनमधून हा विषाणू जगभर पसरला, तसंच चीनने हे हेतुपुरस्सर घडवून आणल्याचा दावा याआधी जगभरातील संशोधकांनी केला होता. आता, एक जुन्या मुलाखतीचा दाखला देत एएनआयने एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, वुहानमधील एका संशोधकानेही करोना संसर्गावरून चीनलाच कारणीभूत ठरवले आहे.

Strained US China Relations news in marathi
चीन अमेरिका संबंध आणखी बिघडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
US China Relations , US China, Xi Jinping ,
चीनवर अमेरिकी निर्बंधांचा राजकीय परिणामही दिसेल…
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Health Special , HMPV , careful , Health ,
Health Special : एचएमपीव्हीला (HMPV) घाबरू नका पण काळजी घ्या
Squid Game
Video: “पुण्यात खेळला जाणार का Squid Game?”, पुणे स्टेशनवर Ddakji खेळताना दिसल्या दोन व्यक्ती? वाचा, पुणेकरांच्या मजेशीर प्रतिक्रिया
AI generated image of PM Narendra Modi Goes Viral
PM Narendra Modi: कामगाराने गुपचूप काढला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो? पण व्हायरल दावा खरा की खोटा? वाचा सत्य बाजू…

वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीमधील संशोधक चाओ शाओ यांनी एका मुलाखतीत असा करोना विषाणूची निर्मिती हेतुपुरस्सर केल्याचा दावा केला होता. इंटरनॅशलन प्रेस असोशिएशनच्या पत्रकार जेनिफर झेंग यांनी ही २०१९ मध्येच ही मुलाखत घेतली होती. चीन आणि चायनिज कम्युनिस्ट पक्षाबाबत अंतर्गत बातमी पुरवण्यासाठी जेनिफर प्रसिद्ध आहेत.

२६ मिनिटांच्या मुलाखतीत चाओ शाओ म्हणाले की, “संशोधक शॅन चाओ यांनी करोनाचे चार स्ट्रेन तयार केले होते. त्याची चाचणी घेण्यास सांगितली होती. तसंच, या चार स्ट्रेनपैकी कोणता सर्वाधिक प्रभावी आहे, हे शोधण्यासाठी सांगण्यात आले होते.” तसंच, करोना व्हायरस हे जैवशस्त्र असल्याचंही ते म्हणाले.

“आरोग्य आणि स्वच्छतेची स्थिती तपासण्यासाठी विविध देशातील अॅथलिट थांबलेल्या हॉटेलमध्ये काही अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं होतं. स्वच्छतेची तपासणी करण्याकरता विषाणूशास्त्रांची गरज नसते”, यावरून चाओ शाओ यांनी संशय व्यक्त केला आहे. “हे अधिकारी तपासणी करण्याकरता गेले नव्हते तर विषाणू पसरवण्याकरता किंवा विषाणू प्रभावी आहे की नाही हे पाहण्याकरता गेले होते”, असा दावाही या संशोधकांनी केला आहे.

Story img Loader