Cyclone Biparjoy Gujarat Updates: गेल्या काही दिवसांपासून देशात बिपरजॉय चक्रीवादळाची चर्चा पाहायला मिळत आहे. अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत हे चक्रीवादळ अरबी समुद्रात पाकिस्तानच्या दिशेनं मार्गक्रमण करताना दिसत होतं. मात्र, दोन दिवसांपूर्वी या चक्रीवादळानं दिशा बदलून गुजरतच्या दिशेनं आपला मोर्चा वळवल्यानं किनारी भागातील सर्वच यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरुवारी अर्थात १५ जून रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास हे चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ भागातील जखाऊ बंदराला धडकणार आहे. एकीकडे जमिनीवर या वादळाचं रौद्र रुप चिंता निर्माण करत असताना दुसरीकडे अवकाशातून बिपरजॉय चक्रीवादळाचं काळजात धडकी भरवणारं रुप दिसलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवकाशातून काढलेली छायाचित्रे व्हायरल!

बिपरजॉय चक्रीवाजळाची अवकाशातून काढलेली काही छायाचित्रे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. काही नेटिझन्सनी “हे इतकं मोठं असेल याची कल्पनाच केली नव्हती”, असं म्हणत आश्चर्य व्यक्त केलं आहे. काहींनी, “हे विलक्षण दिसत आहे”, असं म्हटलं आहे. तर पाकिस्तानमधील काहींनी ट्वीट करत या वादळाचं हे अक्राळ-विक्राळ रुप पाहून चिंता व्यक्त केली आहे.

कुणी काढले Biparjoy Cyclone चे फोटो?

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये सध्या संशोधन करणारे अंतराळवीर सुलतान अलनेयादी यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी करून बिपरजॉय चक्रीवादळाचे काही फोटो पाठवण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार आता त्यांनी दोन दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून काढलेले चक्रीवादळाचे तीन फोटो आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट केले आहेत. या फोटोंमधून चक्रीवादळाचं भयानक रुप पाहायला मिळत आहे.

हे तिन्ही फोटो चक्रीवादळाचा आकार, त्याचं भीषण रुप आणि त्यामुळे प्रभावित झालेला एकूण भाग याची सहज कल्पना यावी इतके स्पष्ट आहेत. अंतराळातून पृथ्वीचा नयनरम्य देखावा जरी या फोटोतून दिसत असला, तरी त्यात दिसणारं चक्रीवादळ धडकी भरवणारं आहे.

बिपरजॉय धडकणार गुजरातच्या किनाऱ्याला; मुंबईवर काय होणार परिणाम?

आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेले चक्रीवादळ!

बिपरजॉय चक्रीवादळाला आजवरच्या इतिहासातलं सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ असं म्हटलं जातं. हे नाव चक्रीवादळाला बांगलादेशनं दिलं आहे. हे चक्रीवादळ जखाऊ बंदराला धडकणार आहे. मात्र, त्याचा प्रभाव देवभूमी द्वारका, पोरबंदर आणि राजकोट या भागांमध्येही दिसून येईल. किनारी भागातील जवळपास ५० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. या चक्रीवादळामुळे मुंबई, ठाणे, पालघर या भागांत सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.