Kerala News आम्हाला उपमा नको, खिचडी नको त्यापेक्षा बिर्याणी किंवा चिकन फ्राय द्या अशी मागणी करणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका मुलाचा हा व्हिडीओ आहे. ज्यानंतर अंगणवाडी आहारात बदल करण्याचा निर्णय केरळ या राज्याने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल व्हिडीओत थरजुल शंकर नावाचा एक लहान मुलगा त्याच्या आईला सांगतो आहे की, मला अंगणवाडीत बिर्याणी किंवा चिकन फ्राय हवं मला उपमा नको.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलाच्या आईने हा व्हिडीओ तेव्हा रेकॉर्ड केला आहे जेव्हा तिचा मुलगा तिला बिर्याणी बनव असा आग्रह करत होता. हा व्हिडीओ तिने सहजच इन्स्टाग्रामवर पोस्ट केला जो चांगलाच व्हायरल झाला.

आई तिच्या मुलाला शंकू म्हणते आहे. शंकूची इच्छा कदाचित पूर्ण होईल अशी चिन्हं आहेत. कारण त्याला उपमा नको आहे तर बिर्याणी किंवा चिकन फ्राय हवंय असं तो म्हणतो आहे. बिर्याणी तो किती आनंदाने खात होता आणि त्याने कशी निरागस मागणी केली असा तो व्हिडीओ आहे. ज्याची दखल केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली आहे.

केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज काय म्हणाल्या?

केरळच्या महिला आणि बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनीही हा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर त्यांनी हे म्हटलं आहे की आम्ही लवकरच अंगणवाडी आहार म्हणून देण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये बदल करु. अंगणवाड्यांकडून याबाबतच्या सूचना मागवण्यात येतील असंही त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे. वीणा जॉर्ज पुढे म्हणाल्या, सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून आम्ही मुलांना अंडी आणि दूध आम्ही देत आहोत. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शंकूचं स्वप्न कदाचित पूर्ण होऊ शकतं अशी चिन्हं आहेत.

लवकरच अंगणवाडी होणार स्मार्ट

केरळ सरकारने राज्यातील सर्व अंगणवाड्यांचे स्मार्ट अंगणवाड्यांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, त्यामध्ये अभ्यासिका, विश्रांतीकक्ष, स्वयंपाकघर, स्टोअर रूम, डायनिंग रूम, हॉल, गार्डन तसेच इनडोअर व आऊटडोअर प्ले एरिया आहेत. राज्य सरकारने अंगणवाडी शिक्षकांच्या वेतनातही सुधारणा केली असून, त्यापैकी ९५ टक्के महिला आहेत. अशीही माहिती जॉर्ज यांनी दिली.