Mustafabad Constituency Rename Demand : दिल्ली विधानसभेत आज भाजपा आमदार मोहन सिंह बिष्ट मुस्तफादाबादचं नाव बदलण्याचा प्रस्ताव ठेवणार आहेत. त्याआधीच हे नाव बदलण्यासाठी घमासान सुरू झाले आहे. भाजपा नेत्यांपासून आपच्या अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुस्ताफाबादचे भाजपाचे आमदार मोहन सिंह बिष्ट यांनी स्पष्ट केलं की, मुस्तफाबाद विधानसभा क्षेत्रचं नाव बदलण्यासाठी माझ्याकडे प्रस्ताव आला आहे. १९९८ ते २००८ च्या दरम्यान मी जेव्हा विधायक होतो तेव्हा या क्षेत्राचं नाव करावल नगर होतं. मुस्ताफाबादचं नाव कोणत्याही धार्मिक गुरूच्या नावाने ठेवण्यात आलेलं नाही. येथे मुस्ताफा नावाचा एक प्रॉपर्टी डिलर होता, ज्याने काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून या विधानसभा मतदारसंघाचं नाव मुस्तफाबाद असं ठेवलं.

मंदिर परिसरातील मटणाची दुकाने बंद ठेवा

पुढे ते म्हणाले, आज प्रत्येकाला मुस्ताफाबाद विधानसभा मतदारसंघाचं नाव बदलून शिव विहार करण्याची मागणी केली जात आहे. लोकांच्या धार्मिक भावनांना ठेच न पोहोचण्यासाठी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरातील मटणाची दुकाने बंद केली पाहिजेत. तसंच, नवरात्रीच्या काळात ही दुकाने बंदी ठेवली पाहिजेत.

मुस्ताफाबादमध्ये ४० टक्के मुस्लिम लोकसंख्या

त्यामुळे या विधानसभा मतदारसंघाचं नाव शिवपुरी किंवा शिव विहार नाव ठेवण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो. तसंच, बिष्ट यांनी निवडणूक प्रचारावेळी यासंदर्भात वचनही दिलं होतं. जर मला आमदार म्हणून निवडून आणलंत तर मुस्ताफाबादचं नाव बदललं जाईल, असं आश्वासन बिष्ट यांनी दिलं होतं. बिष्ट १९९८ ते २०१५ पर्यंत करावल नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. यावेळी ते मुस्ताफाबाद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले. येथील लोकसंख्येचा विचार करून या मतदारसंघाचं नाव बदलण्याचा विचार केला जात आहे. मुस्ताफाबादमध्ये ४० ते ४२ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि नामांतरण केल्याने येथील लोकांचा सन्मान वाढेल. २०२० मध्ये जी दंगल झाली होती, त्यावेळी मुस्ताफाबादमध्येही त्याच्या ठिणगी पडल्या होत्या.