पीटीआय, नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप मोठे बहुमत मिळवून सलग सातव्यांदा सत्तेवर येईल, असा अंदाज मतदानोत्तर चाचण्यांनी सोमवारी वर्तवला. हिमाचल प्रदेशात मात्र सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होऊन भाजप काठावरच्या बहुमताद्वारे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करेल, असा चाचण्यांचा निष्कर्ष आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा दुसरा टप्पा सोमवारी पार पडल्यानंतर विविध संस्थांच्या मतदानोत्तर सर्वेक्षणांतील अंदाज जाहीर करण्यात आले. त्यानुसार गुजरातमध्ये भाजपला १८२ जागांपैकी ११७ ते १५१ जागा आणि काँग्रेससह त्याच्या मित्रपक्षांना १६ ते ५१ जागा मिळतील, असा अंदाज आहे. आक्रमक प्रचाराद्वारे मोठी हवा निर्माण केलेल्या ‘आप’ला मात्र तीन ते १३ जागांवर समाधान मानावे लागेल, असे अंदाज आहेत. बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे आवश्यक आहे.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Easy fight for Vijay Wadettiwar in Bramhapuri assembly election 2024
ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये

हिमाचलमध्ये भाजपला २४ ते ४१, तर काँग्रेसला २४ ते ४० जागा मिळतील, असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. ‘आप’च्या खात्यात जेमतेम तीन जागा पडतील, असा अंदाज आहे. या राज्यात विधानसभेच्या ६८ जागा असून बहुमतासाठी ३५ हा जादुई आकडा आहे. तथापि, दोन सर्वेक्षणांचे अपवाद वगळले तर सर्वच मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांनुसार हिमाचलमध्ये भाजपच निर्विवाद बहुमताद्वारे पुन्हा सत्ता स्थापन करेल. भिन्न अंदाज वर्तवणाऱ्या दोन चाचण्यांनुसार भाजप आणि काँग्रेसमध्ये सत्तेसाठी तीव्र रस्सीखेच होईल.

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात ५८.८० टक्के मतदान

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सोमवारी ५८.८० टक्के मतदान झाले. या टप्प्यातील ९३ जागांसाठी ८३२ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर मोदी यांनी ‘रोड शो’ केल्याचा आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मोदी आणि शहा यांनी मतदान सुरू असतानाही भाजपचा प्रचार केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी केला.

मतमोजणी गुरुवारी..

गुजरात आणि हिमाचल या दोन्ही राज्यांतील मतमोजणी गुरुवारी, ८ डिसेंबरला होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी १२ नोव्हेंबरला, तर गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यांत मतदान घेण्यात आले.

गुजरात

    भाजप काँग्रेस आप

न्यूज एक्स- ११७-१४० ३४-५१  ६-१३  

जन की बात

रिपब्लिक टीव्ही  १२८-१४८ ३०-४२  २-१०  

आज तक   १२९-१५१ १६-३०  ९-२१  

एबीपी सी व्होटर १२८-१४० ३१-४३  ३-११  

टुडेज चाणक्य   १५० १९  ११

एकूण जागा : १८२, बहुमताचा आकडा : ९२

हिमाचल प्रदेश

भाजप काँग्रेस आप

३२-४०  २७-३४  ००

३४-३९  २८-३३  ०-१

२४-३४  ३०-४०  ००

३३-४१  २४-३२  ००

३३  ३३  ००

जागा : ६८, बहुमत : ३५

दिल्ली पालिकेत ‘आप’ला बहुमताचा अंदाज

नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेत ‘आप’ला स्पष्ट बहुमत मिळेल आणि भाजपची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात येईल, असा अंदाज तीन मतदानोत्तर चाचण्यांनी सोमवारी वर्तवला. ‘आज तक- अ‍ॅक्सिस’च्या अंदाजानुसार ‘आप’चे उमेदवार १४९ ते १७१ प्रभागांमध्ये विजय संपादन करतील, तर भाजपला ६९ ते ९१ जागा मिळतील. ‘टाइम्स नाऊ-इटीजी’च्या चाचणीनुसार ‘आप’ला १४६ ते १५६, भाजपला ८४ ते ९४ आणि काँग्रेसला ६ ते १० प्रभागांमध्ये विजय मिळेल. ‘द न्यूज एक्स’च्या सर्वेक्षणात ‘आप’ला १५९ ते १७५ आणि भाजपला ७० ते ९२ जागा मिळतील.