उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका शाळेत प्रार्थनेदरम्यान मुलांना कलमा शिकवण्यात आल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कानपूर भाजपासह इतर हिंदू संघटनांनी ही शाळा गंगाजलने साफ केली आहे. तसेच शाळा प्रशासनाने लेखी माफी मागवी, अशी मागणी देखील हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे.
कानपूरच्या सिसामऊ भागात फ्लोरेट्स इंटरनॅशनल स्कूल आहे. येथे गेल्या काही दिवसांपासून मुलांना कलमा शिकवला जातो. या मुलांनी ही प्रार्थना घरी म्हटल्याने त्यांच्या पालकांना संशय आला. त्यांनी मुलांना याबाबत विचारले असता, त्यांना शाळेत हे सर्व शिकवल्या जाते. तसेच कलमा न म्हटल्यास शिक्षक मारतात, असेही या मुलांनी सांगितले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
हेही वाचा – LPG Cylinder Price : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत घट, आजपासून नवीन दर लागू
शाळा प्रशासनाला याबाबत विचारले असता, शाळेत सर्व धर्मियांच्या प्रार्थना शिकवल्या जातात. ही प्रक्रिया अनेक दिवासांपासून सुरू आहे, अशी माहिती शाळेच्या मुख्यध्यापकांनी दिली.
दरम्यान, काही पालकांनी याबाबत पोलिसांत देखील तक्रार केली होती. पोलिसांनी शाळेत जात व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यानंतर शाळेत कोणत्याही धर्माची प्रार्थना शिकवल्या जाणार नाही, केवळ राष्ट्रगीत म्हटल्या जाईल, अशी प्रतिक्रिया एसपी निशंक शर्मा यांनी दिली.