नवी दिल्ली : मणिपूरच्या मुद्दय़ावरून गुरुवारी, अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही संसदेतील कोंडी कायम राहिली. संसदेत ‘इंडिया’च्या सदस्यांनी काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध केला. त्यावर, ‘काळे कपडे घालणाऱ्यांचे भविष्य काळे असून देश त्यांना सहन करणार नाही’, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत केला.

काळे कपडे घालणाऱ्या विरोधकांकडे देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेले बळ समजून घेण्याची क्षमता नाही. त्यांचे मन काळे असून काळे धन लपवण्यासाठी त्यांनी काळे कपडे घातले असावेत. विरोधकांचा भूतकाळ काळाच होता, त्यांचे वर्तमान आणि भविष्यही काळेच असेल, अशी टीका गोयल यांनी केली. भाजपप्रणीत केंद्र सरकार स्वत:पुरते बघत नाही. आम्ही विरोधकांच्या आयुष्यातील काळोखही दूर करू, त्यांनाही सूर्यकिरणे पाहाता येतील, त्यांच्यावरील डागही नाहीसे होतील. विकसित, समृद्ध भारतासाठी कमळ फुललेले दिसेल, अशा चारोळय़ा गोयल यांनी राज्यसभेत व नंतर लोकसभेत वाचून दाखवल्या!

anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
massajog sarpanch killed marathi news
मस्साजोगच्या सरपंचाचा अपहरणानंतर मृतदेह आढळल्याने केजमध्ये तणाव; ग्रामस्थ आक्रमक, रुग्णालय परिसरात जमाव
Opposition boycotts MLAs oath taking ceremony in Assembly session Voting through EVMs alleged to have been rigged Print politics news
आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार
subhash dhote loksatta news
पोस्टल मतदानात काँग्रेस आघाडीवर मात्र, ईव्हीएमवर भाजप… काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे म्हणतात, “बाऊंसर लावून पैसे वाटप”
three day special session in maharashtra legislative assembly start from today
विशेष अधिवेशन आजपासून: नव्या सदस्यांना शपथ, सोमवारी विधानसभा अध्यक्षांची निवड
Devendra Fadnavis Maharashtra CM Oath Ceremony
Maharashtra CM Swearing Ceremony : ‘मी पुन्हा येईन’ अखेर प्रत्यक्षात; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत दिमाखदार शपथविधी सोहळा

काळय़ा कपडय़ांचे समर्थन करताना काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, पंतप्रधानांच्या अहंकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही काळे कपडे घातलेले आहेत. देश जळत असताना, मणिपूरमध्ये वांशिक हिंसा होत असताना पंतप्रधानांना फक्त स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे. गोगोई यांनी लोकसभेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडला आहे. मात्र, त्यावरील चर्चेची तारीख व वेळ लोकसभाध्यक्षांनी निश्चित
केलेली नाही.

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत परराष्ट्र धोरणावर विस्तृत निवेदन दिले पण, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या ‘इंडिया-इंडिया’ व ‘मोदी-मोदी’च्या घोषणांनी सभागृह दणाणून टाकले. या गदारोळात वरिष्ठ सभागृह तहकूब करावे लागले. लोकसभेतही गोंधळ सुरू राहिल्याने सभागृह दोन वेळा तहकूब झाले. ‘विरोधक स्वत:ला इंडिया म्हणवून घेतात पण, इंडियाबद्दलची माहितीही त्यांनी ऐकून घेतली नाही’, असा संताप जयशंकर यांनी सभागृहाबाहेर व्यक्त केला. दुपारच्या सत्रात मणिपूरच्या मुद्दय़ावरून राज्यसभेत विरोधकांनी सभात्याग केला.

गोयल यांनी चिथावणी दिली?

भाजपने संसदेत शालीनता व शिष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या भाषणात व्यत्यय आणण्यासाठी पीयूष गोयल यांनी भाजप सदस्यांना चिथावणी दिल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. दरम्यान, ‘आप’चे निलंबित खासदार संजय सिंह यांचे संसदेच्या आवारातील ठिय्या आंदोलन गुरुवारीही सुरू होते. काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सिंह यांची संसदेमध्ये जाऊन भेट घेतली.

‘भाजप-संघ देशाचे विभाजन करत आहे’, राहुल गांधी यांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. ‘भाजप आणि संघ देशाचे विभाजन करत आहेत, त्यांना केवळ सत्तेमध्ये रस असून ते त्यासाठी काहीही करतील, ते मणिपूरला आग लावतील, संपूर्ण देशाला आग लावतील. त्यांना देशाचे दु:ख आणि वेदना याबद्दल काहीही फिकीर नाही’, असा आरोप राहुल यांनी केला.

Story img Loader