Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Saamana critiques Shiv Sena leadership on Balasaheb Thackeray’s birth anniversary, targeting the Shinde faction.
“शिवसेनारूपी कवचकुंडले मोडून ती तोतया शिंदेंच्या हाती सोपवली”, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती दिनी ठाकरे गटाची टीका
bombay HC slaps Rs 1 lakh cost on ED for case on realtor
विकासकावर खोटा खटला; पुराव्यंशिवाय कारवाई, न्यायालयाचे ताशेरे
Cecile Richards personality
व्यक्तिवेध : सीसिल रिचर्ड्स
ajit pawar
उलटा चष्मा : भ्रष्ट असलो, तर काय बिघडले?
NCPs MLA from Wai Makarand Jadhav appointed as Guardian Minister of Buldhana
बुलढाणा पालकमंत्री निवडीतही धक्कातंत्र; राष्ट्रवादीची बाजी

नवी दिल्ली : ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा आधार घेत भाजप गैरप्रचार आणि गैरसमज पसरवत असून देशात विषारी वातावरण निर्माण करत असल्याचा अत्यंत गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला. दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्य विभागाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते. शालेय अभ्यासक्रमातून भाजप लहान मुलांची मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तीन दिवसांतील राष्ट्रवादी काँग्रेसचा दिल्लीमध्ये झालेला हा दुसरा जाहीर कार्यक्रम आहे. पक्षाच्या स्थापनादिनी, १० जूनलाही मोठा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद पवार यांच्याकडे देण्याची मागणी करणारा ठराव पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात संमत झाला होता. त्यानंतर गुरुवारी पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमात भाजपविरोधात कठोर भूमिका घेतली.

काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडावे लागले पण, तिथे मुस्लिमांनाही लक्ष्य बनवले गेले होते. ‘काश्मीर फाइल्स’च्या माध्यमातून भाजप धार्मिक आणि सामाजिक वातावरण बिघडवत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनालाही परवानगी देण्याची गरज नव्हती. देशातील सामाजिक सामंजस्य टिकवण्याचा प्रयत्न न करता हा चित्रपट करमुक्त करून भाजपचे नेते लोकांना तो बघण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, अशी टीका पवार यांनी केली.

काश्मिरी पंडित आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जबाबदार होत्या, असे सांगत पवार म्हणाले की, काश्मीर प्रश्नाला सातत्याने पंडित नेहरूंना जबाबदार धरणे योग्य नाही. काश्मिरी पंडित खोऱ्यांतून बाहेर पडले तेव्हा केंद्रात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता. मुफ्ती महम्मद सईद हे केंद्रीय गृहमंत्री होते, जगमोहन राज्यपाल होते. याच जगमोहन यांनी भाजपच्या तिकिटावर दिल्लीत लोकसभेची निवडणूक लढवली होती, असा शाब्दिक प्रहार पवार यांनी केला.

मोदी सरकारला खरोखरच काश्मिरी पंडितांची काळजी असती तर केंद्राने त्यांचे पुनर्वसन केले असते. पण, हे सरकार मुस्लिमांविरोधात लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहे.

– शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

Story img Loader