राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्या नितीमूल्यांपासून दूर जात असल्याचा ‘साक्षात्कार’ बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना सोमवारी झाला. संयुक्त जनता दलाने रविवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या १७ वर्षांपासूनचा भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाचा घरोबा यामुळे संपुष्टात आला. त्यानंतर सोमवारी पत्रकार परिषदेत नितीशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर टीका केली.
पाटण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात बोलताना नितीशकुमार म्हणाले, नितीमूल्यांच्या बाबतीत संयुक्त जनता दला कोणाबरोबरही समझौता करणार नाही. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आपल्या नितीमूल्यांपासून दूर चालली आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांचा काळ आता संपुष्टात आलाय आणि भाजपमधील नवीन नेतृत्त्वासोबत संयुक्त जनता दल जुळवून घेऊ शकणार नाही, असे सांगून काही बाहेरच्या व्यक्ती बिहारमधील भाजपच्या संघटनेवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका नितीशकुमार यांनी केली. भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या सूचनांकडे इतर नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नितीशकुमारांनी केला.

Story img Loader