Lok Sabha Election Result : आज देशाच्या राजकारणातील सर्वात मोठा दिवस आहे. ४३ दिवसा चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणूक निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये अनेक दिग्गज लोक रिंगणात उतरले आहे. बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रणौत भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. त्यामुळे मंडी लोकसभा मतदार संघात काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कंगणा रणौतने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आईबरोबरच्या काही फोटो शेअर केल्या आहेत. या फोटोंमध्ये कंगणाची आई तिला दही साखर भरवताना दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये कंगणाने लिहिलेय, “आई देवाचे रूप आहे. आज माझ्या आईने मला दही साखर खाऊ घातली”
पाहा फोटो
“मी कुठेही जाणार नाही.”
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध काँग्रेस अशी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजपाने बॉलीवूडची क्वीन सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौतला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे तर तर दुसरीकडे काँग्रेसने या मतदारसंघातून राजघराण्यातील वंशज विक्रमादित्य सिंह यांना स्पर्धेत उतरवले आहे. कंगणा रणौत आणि विक्रमादित्य सिंह दोघेही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. विक्रमादित्य सिंह यांनी कंगनावर केल्यावर टिकेवर एएनआयशी बोलताना तिने आज यावर उत्तर दिले आहे.
कंगणा म्हणाली, “त्यांना अशा प्रकारे बोलण्याचा परिणाम भोगावा लागेल. कोणत्याही महिलेविषयी असे बोलणे किती चुकीचे आहे, हे यावरून स्पष्ट होत आहे कारण मंडीमधून भाजप आघाडीवर आहे. माझी ही जन्मभूमी आहे. मोदींचे स्वप्न ‘सबका साथ सबका विकास’मध्ये त्यांची सेना बनून काम करणार. मी कुठेही जाणार नाही. होऊ शकते इतर लोकांना त्यांच्या बॅग भरून जावे लागू शकते पण मी कुठेही जाणार नाही.”
हेही वाचा : “राहुल गांधींनी जिम सुरू करावी, शशी थरूर…”, राजीव चंद्रशेखर यांचा टोला; काँग्रेस नेत्यांना दिला ‘हा’ सल्ला
पाहा व्हिडीओ
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला आहे. याआधी भाजपाने २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत भाजपाने बहुमत मिळवलं होतं. यावेळी भाजपाने स्वतः ३७० जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. आता आपण जाणून घेऊ भाजपाने २०१४ मध्ये किती जागा लढवल्या आणि २०१९ मध्ये किती जागा लढवल्या? २०१४ मध्ये भाजपाने ४२८ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी २८२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तर २०१९ ला भाजपाने ४३६ जागांवर निवडणूक लढवली आणि ३०३ जागा मिळवल्या होत्या.
भाजपाने २०१४ आणि २०१९ या दोन्ही वर्षांमध्ये बहुमताच्या संख्येपक्षा जास्त जागा मिळवल्या. आता या खेपेला म्हणजेच २०२४ मध्ये भाजपाने ४४१ जागा लढवल्या आहेत. तर १०२ जागा मित्र पक्षांना दिल्या आहेत. आता या यावेळी ४४१ पैकी ३७० जागा भाजपा जिंकतंय का हे आज स्पष्ट होणार आहे. २०१९ मध्ये भाजपाला जी मतं मिळाली त्याची सरासरी २०१४ च्या तुलनेत अधिक होती. २०१९ मध्ये भाजपाच्या विजयाचा स्ट्राईक रेट हा ६९ टक्क्यांवर पोहचला होता. आता या वेळी काय निकाल लागतो? एकट्या भाजपाला किती जागा मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.