भाजपचे नौशेरा मतदारसंघातील उमेदवार रवींदर रैना यांना जबरी मारहाण केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी पीडीपीच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या रैना यांना जम्मूच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपने या हल्ल्यासाठी पीडीपीवर टीका केली असून, हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे नेण्याचे ठरवले आहे. या गुन्हय़ात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे राजौरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मोहम्मद हबीब यांनी सांगितले.या हल्ल्यात भाजपचे तीन तर पीडीपीचे पाच कार्येकर्ते जखमी झाले होते. जखमींमध्ये भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष रैना यांचा समावेश आहे.
असे हल्ले सहन केले जाणार नाही असा इशारा भाजप प्रवक्ते सुनील सेठी यांनी दिला आहे.

Story img Loader