लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. याद्यांमधून अनेक उमेदवारांची नावे प्रसिद्ध झाली आहेत तर दुसरीकडे विरोधात मोठ्या ताकदीचे उमेदवार देण्यासाठी सगळ्याच पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता पश्चिम बंगालमधील कृष्णनगर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत राजमाता अमृता रॉय?

कृष्णनगर मतदारसंघाला सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा आहे. १८ व्या शतकापासून कृष्णनगर राजवाड्याचा गौरवशाली इतिहास राहिलेला आहे. विशेषतः बंगालमधील राजा कृष्णचंद रॉय हे दूरदृष्टी लाभलेले एक जागरूक राज्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या ५५ वर्षांच्या राजवटीच्या काळात विविध प्रशासकीय सुधारणा आणि विविध कलांचे संवर्धन केले. बंगाली संस्कृती आणि वारसा जपण्यामागे त्यांचा मोठा वाटा आहे. नादिया राजघराण्याशी संबंध असलेले कृष्णचंद रॉय हे वयाच्या १८ व्या वर्षी सिंहासनावर बसले. त्यांनी राज्यासाठी अनेक विकसित धोरणे राबविली. त्यांच्या राजवटीतील निर्णयांनी तत्कालीन समाजावर आणि भविष्यावर कायमस्वरूपी प्रभाव टाकला. बंगालच्या नादिया जिल्ह्यातील कृष्णनगरचा राजवाडा हा वास्तुशास्त्रीय वैभव आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा राजवाडा आहे. एकेकाळी हा विस्तीर्ण राजमहाल कृष्णनगरच्या राजांचे निवासस्थान होता. आजही या राजवाड्यात तेथील वैविध्यपूर्ण गोष्टी जपल्या आहेत. बंगालच्या सुधारित जीवनशैलीचा पुरावा म्हणून कृष्णनगर येथील हा राजवाडा प्रसिद्ध आहे. इतका मोठा वारसा लाभलेल्या कुटुंबाच्या वारस असलेल्या राजमाता अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भाजपाला कृष्णनगरमध्ये मोठा फायदा होईल असं राजकीय तज्ञांचं मत आहे.

40 thousand seats of public representatives are vacant in state
राज्यात लोकप्रतिनिधींच्या ४० हजार जागा रिक्त
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
parliament congress protest
‘इंडिया’चा दबाव झुगारून काँग्रेसचे आंदोलन
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक

कशी निश्चित झाली उमेदवारी?

अमृता रॉय यांना उमेदवारी निश्चित करण्याबाबत सर्वप्रथम नादिया जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेतला. त्यानंतर पक्षाने अमृता यांच्याशी संपर्क करून पक्षात सामील होण्यावर चर्चा केली. अमृता रॉय यांच्याशी त्याआधी अनेक चर्चा, बैठका घडल्या होत्या. त्यानंतर त्यांनी उमेदवारीबाबत सहमती दर्शविली.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील स्थिती

दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार असलेल्या महुआ मोईत्रा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णनगर मतदासंघांतून ६ लाख १४ हजार ८७२ मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांच्याविरुद्ध उभे असलेले भाजपाचे उमेदवार कल्याण चौबे यांना ५ लाख ५१ हजार ६५४ मते मिळाली होती. कल्याण चौबे यांचा ६३ हजार २१८ मतांनी पराभव झाला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महुआ मोईत्रा यांना चोप्रा, पलाशिपारा आणि कालीगंज विधानसभेतून भरघोस मते मिळाली होती. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत कालीगंज विधानसभेत भाजपाने आपला पाया मजबूत केला आहे. आणि दुसऱ्या बाजूला तृणमूल काँग्रेस कमकुवत झाली आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि तृणमूलमधील आपापसातील संघर्षामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला फायदा होऊ शकतो. भाजपाच्या सूत्रांनुसार या निवडणुकीत अमृता रॉय प्रभावशाली चेहरा ठरतील. राजमाता अमृता यांना उमेदवारी दिल्यामुळे आणि पक्ष मोठ्या ताकदीने इथे काम करत असल्यामुळे पक्षाला जास्त मते मिळतील असे दावेही केले जात आहेत.

Story img Loader