देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. यातच, देशात लोकशाहीची हत्या झाल्याचं राहुल गांधी वारंवार म्हणत आहेत. यावरून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून उभी राहिलेली अभिनेत्री कंगना रणौत हिनेही राहुल गांधींवर आता पलटवार केला आहे. ती आज माध्यमांशी बोलत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात लोकशाहीची हत्या झाली आहे, असं राहुल गांधी सातत्याने म्हणत आहेत. यावर तुमचं मत काय असा प्रश्न पत्रकारांनी कंगना रणौतला विचारला. त्यावर कंगना रणौत म्हणाली, जर लोकशाहीची हत्या होत आहे, तर आपण कशाची तयारी करतोय? लोकांचं मन जिंकणं, लोकांकडून त्यांच्या सहकार्याची अपेक्षा करणे, लोकांना आपण सहकार्य करणे, त्यांचं तुमच्यावर विश्वास असणं, प्रेम असणं, त्यांच्याबरोबर संबंध असणं ही लोकशाहीची हत्या आहे का? हीच लोकशाही आहे. कदाचित त्यांना लोकशाहीची व्याख्या माहीत नाही.

राजघराण्याला नव्या राजपूतचे आव्हान?

हिमाचल प्रदेशमध्ये पारंपरिक दोन राजपूत ‘राजघराण्यां’चे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसचे वीरभद्र सिंह व भाजपचे प्रेमकुमार धुमळ. दोघेही मुख्यमंत्री झाले होते. राजस्थानमध्ये काँग्रेसचे अशोक गेहलोत व भाजपच्या वसुंधरा राजे यांना दर पाच वर्षांनी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत असे. राजस्थानमध्ये जशी राजकीय परिस्थिती बदलली तशी हिमाचल प्रदेशमध्येही बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंडीमधून कंगना रणौत हिला उमेदवारी देऊन दोन्ही पक्षांच्या ‘राजघराण्यां’ची मक्तेदारी मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. कंगना रणौतही राजपूत असल्याने दोन्ही राजपूत ‘राजघराण्यां’ना नव्या राजपूत उमेदवाराने आव्हान दिल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >> कंगना राणौतची सर्वात मोठी भूमिका; करिअरसाठी जो जिल्हा सोडला, त्याच मंडीतून मिळाली लोकसभेची उमेदवारी

मंडी जिल्ह्यातील भांबला येथूनच १६ वर्षीय कंगना रणौतने वडिलांच्या इच्छेविरुद्ध जात अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी घर सोडले. त्यानंतर तिने एकाहून एक चांगले चित्रपट केले. तिचा पहिला चित्रपट गँगस्टर (२००६) मध्ये हिट ठरला आणि तिचे यश झपाट्याने वाढले, त्यानंतर फॅशनमधील सहाय्यक अभिनेत्रीसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार (२००८)ही मिळाला. क्वीन (२०१४), तनु वेड्स मनु रिटर्न्स (२०१५), मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी (२०१९) आणि पंगा (२०२०) या राष्ट्रीय चित्रपटातही तिनं आपल्या अभिनयानं ठसा उमटवला. २०२१ मध्ये रणौतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate kangana ranaut critisice rbjp candidate kangana ranaut criticize congress mp rahul gandhi on democracy sgk ahul gandhi about democracy sgk
Show comments