BJP Candidate list 2024 : भाजपाचे राष्ट्रीय महासचिव यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३४ मंत्र्यांना स्थान देण्यात आलं आहे. मात्र पहिल्या यादीत नितीन गडकरींना स्थान नाही. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विनोद तावडेंनी जाहीर केली यादी

विनोद तावडे यांनी भाजापाच्या उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणामधील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीमधील ५, जम्मू काश्मीरमधील २, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २, गोव्यातील १, त्रिपुरामधील १, अंदमान निकोबारमधील १ आणि दिव-दमणमधील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

हे पण वाचा- नितीन गडकरींची मल्लिकार्जुन खरगेंना नोटीस; म्हणाले, “तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा…”

२८ महिलांना उमेदवारी

भाजपाने आज जाहीर केलेल्या यादीत एकूण २८ महिलांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या पुन्हा एकदा अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसणार आहेत. तर भाजपाने हेमा मालिनी यांनाही उमेदवारी घोषित केली आहे. हेमा मालिनी या मथुरा लोकसभा मतदारसंघातून निडवणूक लढवणार आहेत. मात्र नितीन गडकरी यांचं नाव या यादीत कसं नाही? याची चर्चा आता रंगली आहे.

नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. तर अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी घोषित करण्यात आली. दरम्यान, असे असले तरी नितीन गडकरी यांना पहिल्या यादीत स्थान दिले नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्यांना दुसऱ्या यादीत उमेदवारी घोषित करण्यात येणार का? किंवा भाजपचे यामागे काही धक्कातंत्र आहे? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidate list for loksabha elections nitin gadkari name is not in first list scj
Show comments