व्यापम घोटाळा गाजत असतानाच सत्तारूढ भाजपने मध्य प्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दणदणीत विजय मिळवला. १० पैकी ८ ठिकाणी भाजपने यश मिळवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे मतदारांचे आभार मानले आहेत.भाजपने मोरेना, उज्जैन, हर्दा, चघट, विदीशा, भैंदसदेही, कोटर, सुवासरा येथील पालिकांत बहुमत मिळवले. तर सारंगपूर येथे काँग्रेस तर गुहवरामध्ये अपक्ष अध्यक्ष निवडून आला आहे. या वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही भाजपने जिंकल्या होत्या. मात्र या दहा ठिकाणी काही कारणांनी मतदान झाले नव्हते. मतदारांच्या पाठिंब्याबद्दल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आभार मानले आहेत. या निकालानंतर काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे असा सल्ला भाजपने दिला आहे.