भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रविवारी दुसर्‍या आणि शेवटच्या दिवशी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. भाजपला २७२+ जागांवर विजयी करण्यासाठी होत असेलल्या या अधिवेशनात सुषमा स्वराज म्हणाल्या, की काँग्रेस निवडणुकीतील पराभवाला घाबरली असून याच कारणामुळे त्यांनी आतापर्यंत पंतप्रधानपदाचा उमदेवार घोषित केला नाही. यांना आतील आवाज उशिराने ऐकू येत आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यूपीएच्या काळात देशाची अर्थव्यवस्था डबाघाईला आली आहे. सामान्या जनता महागाईने त्रस्त आहे.  सोनिया गांधीच्या डोळ्यावर पट्टी बांधली असून, त्यांना प्रत्यक्षपरिस्थिती काहीच दिसत नाही.  स्वराज यांनी नंतर पाटणा येथील बॉम्बस्फोट संदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही निशाणा साधला आणि हा सरकारचा हलगर्जीपणा असल्याचे सांगितले.