विरोधी पक्षाचा संसदेत गदारोळ; कामकाज तहकूब
कोळसा गैरव्यवहार प्रकरणाची महत्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याचे संसदेत स्पष्ट झाल्यानंतर या विषयासंदर्भात पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी तातडीने निवेदन सादर करावे, अशी मागणी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने(भाजप) केली.
कोळसा गैरव्यवहार प्रकरणाची कागदपत्रे गहाळ झाल्याच्या मुद्द्यावरुन ‘शेम-शेम’ ‘पंतप्रधान जवाब दो’ असे नारे देण्यास भाजप नेत्यांनी सुरुवात केली. भाजपच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज याप्रकरणी बोलताना पंतप्रधानांनी लोकसभेत येऊन या प्रकरणी सरकारची बाजू स्पष्ट करावी” अशी मागणी केली. त्याचबरोबर, पंतप्रधानांनी संसदेस विश्वासात घेऊन कोळसा गैरव्यवहार प्रकरणाच्या गहाळ झालेल्या १४७ फाईल्सची माहिती द्यावी असेही सुषमा स्वराज म्हणाल्या.
संसदेत या मुद्यावरून भाजपने गदारोळ घातल्याने संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा