स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तारूढ भाजपचा कस लागणार आहे. पटेल आरक्षण आंदोलनाच्या परिणामांनी सत्तारूढ पक्षाला ग्रासले असल्याने भाजपच्या २० वर्षांच्या राजवटीची खरी कसोटी लागणार आहे.
राज्यातील निवडणुकाजिंकण्यासाठी काँग्रेसने क्षत्रिय, हिरजन, आदिवासी आणि मुस्लीम समाजाचे सूत्र ठरविण्याची योजना आखली आणि संख्येने मोठय़ा असलेल्या पटेल समाजाला दूर केले. त्यानंतर पटेल समाजाने भाजपला समर्थन दिले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती आणि पटेल आरक्षण आंदोलन यामुळे गुजरातमधील निवडणुका या वेळी उत्कंठावर्धक ठरणार आहेत. आपली मागणी पूर्ण होत नसल्याने पटेल समाजाने शासकीय आणि भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सातत्याने व्यत्यय आणला आहे. एकीकडे हा प्रकार सुरू असताना दुसरीकडे सरकारने कठोर भूमिका घेत पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले आहे. त्यामुळे पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याची ही संधी असल्याचे काँग्रेसला वाटत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा