प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानाने घातलेल्या हैदोसावरून भारतीय जनता पक्षाने केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. देशाच्या सीमा आणि नागरिकांच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी सक्षम नसल्याचे सरकारने दाखवून दिले आह़े, अशी बोचरी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना केली़  पाकच्या कुरापती रोखण्यासाठी युद्ध हाच पर्याय आहे का, याचा विचार सरकार आणि लष्कराने करावा़  त्यांनी युद्धाचा पर्याय निवडला तर त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असेही जोशी यांनी सांगितल़े
केंद्राची राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेबाबतची धोरणे अत्यंत कमकुवत आहेत़  पाकिस्तानला वागवायला हवे, त्या पद्धतीने वागविले जात नाही़, अशी टीकाही मुरली मनोहर जोशी यांनी केली आहे.

Story img Loader