काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सुरू झाल्यापासूनच राहुल गांधी यांच्या टी-शर्टबाबत अनेक चर्चा रंगताना दिसून येत आहेत. आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेतही पत्रकारांनी राहुल गांधींना याबाबत प्रश्न विचारले. यावेळी बोलताना त्यांनी ”तुम्ही स्वेटर घालता कारण तुम्हाला थंडीची भीती वाटते. मात्र, मला मला थंडीची भीती वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपाने खोचक टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “राहुल गांधी जर भाजपा आणि RSS ला गुरू मानत असतील तर त्यांनी नागपूरला जाऊन…” हिमंता बिस्वा शर्मांचा पलटवार

राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते?

आज दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी एका पत्रकाराने त्यांना तुमचा टी-शर्टचं रहस्य काय? असा प्रश्न विचारला असता, मला एक कळत नाही, माझ्या टी शर्टवर एवढा आक्षेप का घेतला जातो? एवढी चर्चा का केली जाते आहे. या टी-शर्टमध्ये एवढं आक्षेप घेण्यासारखं काय आहे? तुम्ही स्वेटर घातला आहे, कारण तुम्हाला थंडी वाजेल ही भीती वाटते. मला थंडीची भीती वाटत नाही, पण मला जर थंडी वाजण्यास सुरूवात झाली, तर मी स्वेटर नक्की घालेन, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

हेही वाचा – “BJP-RSS गुरूसमान, त्यांच्यामुळेच मला…”; खोचक टोला लगावत काय म्हणाले राहुल गांधी?

दरम्यान, राहुल गांधींच्या या विधानावरून भाजपाने खोचक टीका केली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी राहुल गांधींचा व्हिडीओ ट्वीट करत काँग्रेसवाले एवढं ज्ञान कसं सहन करतात? असा प्रश्न विचारला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticized rahul gandhi after statement on cold and t shirt spb