भाजपने पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी निवडणूक लढवणार नाही तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे स्पष्टीकरण माजी कर्णधार सौरव गांगुलीने देत राजकारण प्रवेशाची शक्यता फेटाळली. सौरव पक्षात येणार नसल्याचे भाजप प्रवक्ते सिद्धार्थ नाथ सिंह यांनी स्पष्ट केले.गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक लढवण्याची भाजपची विनंती सौरवने धुडकावली होती. गांगुलीला पक्षात घेतल्यास तृणमूल काँग्रेसला आव्हान उभे करता येईल असा विचार करून त्याला पक्षात घेण्याचा विचार सुरू असल्याचे वृत्त होते. त्यातच एका उद्योगपतीने गुरुवारी रात्री ट्विटरवरून सौरव भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सौरवच्या भाजप-प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली. गांगुलीबाबत आम्हाला आदर आहे. आमच्या काही नेत्यांशी सौरवचे सौहार्दाचे संबंध आहेत असे सिद्धार्थ नाथ सिंह यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानात इतर नामांकित व्यक्तींबरोबरच सौरवची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2015 रोजी प्रकाशित
भाजप प्रवेशाची शक्यता गांगुलीने फेटाळली
भाजपने पक्षात येण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र मी निवडणूक लढवणार नाही तसेच भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे स्पष्टीकरण माजी कर्णधार सौरव गांगुलीने देत राजकारण प्रवेशाची शक्यता फेटाळली.
First published on: 23-01-2015 at 05:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp did make an offer but i am not joining sourav ganguly